सातारा जिल्ह्यातून किमान 500 बांधकाम कामगार 21 ऑक्टोबर पासूनच्या आंदोलनामध्ये मुंबई आझाद मैदान मध्ये येणार.

सातारा जिल्ह्यातून किमान 500 बांधकाम कामगार 21 ऑक्टोबर पासूनच्या आंदोलनामध्ये मुंबई आझाद मैदान मध्ये येणार.

सातारा जिल्ह्यातून किमान 500 बांधकाम कामगार 21 ऑक्टोबर पासूनच्या आंदोलनामध्ये मुंबई आझाद मैदान मध्ये येणार.
सातारा जिल्ह्यातील विविध कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न.
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने सातारा जिल्ह्यातील फलटण येथे शनिवार दिनांक 17/ 10/ 2026 रोजी दुपारी तीन वाजता झाली.जिल्ह्यातील विविध कामगार संघटनांचे अध्यक्ष सेक्रेटरी पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
या बैठकीस मार्गदर्शन करताना कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की 21 ऑक्टोबर 2026 पासून मुंबई आझाद मैदान येथील सुरू होणाऱ्या आंदोलनातील प्रमुख मागणी ही राज्यातील सर्व अठरा लाख नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी किमान दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान बोनस मिळाले पाहिजे अशी आहे.
राज्यातील मागील दोन वर्षापासून प्रलंबित असलेले किमान 33 लाख अर्ज मंजूर झाले म्हणून महाराष्ट्र शासनाने घोषित करून कामगारांना प्रत्यक्षात लाभ देण्याची अंमलबजावणी केली पाहिजे.
13 जुलै 2026 रोजी काढण्यात आलेले तीन बेकायदेशीर व बांधकाम कामगारांच्या वर अन्याय करणारे जीआर ताबडतोब रद्द करून पूर्वीच्या सर्व योजना अंमलात आणल्या पाहिजे.
वरील सर्व मागण्यांच्या संदर्भात व्यापक बैठकीमध्ये हिंदुराव गायकवाड ,अमित गायकवाड , संजय कुमार निकाळजे, सोमनाथ शिंदे, अमोल झेंडे, राजकुमार सुतार, संजय अब्दागिरे, शिवाजी कचरे, शरद झेंडे व माधुरी शेळके इत्यादी विविध पदाधिकारी यांनी आपली सकारात्मक भूमिका मांडून 21 ऑक्टोबर रोजी सातारा जिल्ह्यातून किमान 500 बांधकाम कामगार कार्यकर्ते उपस्थित राहतील असे आश्वासन दिले.
कॉ शंकर पुजारी यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील बांधकाम, कामगार कार्यकर्ते ,नेते व पदाधिकारी आणि अशाच प्रकारे तयारी करून प्रचंड संख्येने 21 तारखेस मुंबईस उपस्थित राहावे असे आवाहन केलेले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *