इचलकरंजी ‘राधाकृष्ण पाणी योजने’विरोधात नवे दानवाड येथे जल सत्याग्रह आंदोलन

इचलकरंजी ‘राधाकृष्ण पाणी योजने’विरोधात नवे दानवाड येथे जल सत्याग्रह आंदोलन

इचलकरंजी ‘राधाकृष्ण पाणी योजने’विरोधात नवे दानवाड येथे जल सत्याग्रह आंदोलन

नवे दानवाड (प्रतिनिधी):
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने प्रस्तावित असलेल्या अवाजवी व गैरकायदेशीर ₹४३०.१० कोटी खर्चाच्या ‘जुने दानवाड उद्भव राधाकृष्ण ८९ MLD पाणी पुरवठा योजने’विरोधात दानवाड पंचक्रोशीतील शेतकरी, नागरिक आणि लोकप्रतिनिधी आक्रमक झाले आहेत. या जनविरोधी योजनेस तात्काळ व कायमस्वरूपी स्थगिती देऊन ती रद्द करावी, या मागणीसाठी ‘राधाकृष्ण संगमभूमी जल आक्रोश समिती’ आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ पासून नवे दानवाड येथील मारुती मंदिर समोर ‘राधाकृष्ण जल सत्याग्रह’ बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले .

या संदर्भातील सविस्तर कायदेशीर निवेदन मा. जिल्हाधिकारी (कोल्हापूर) आणि मा. तहसीलदार (शिरोळ) यांना सादर करण्यात आले असून, याच्या प्रती मा. मुख्यमंत्री, सांगली पाटबंधारे मंडळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासह स्थानिक प्रशासनाला पाठवण्यात आल्या आहेत.

सांगली पाटबंधारे उपविभागाने (नृसिंहवाडी) दि. २९ मार्च २०२५ रोजी पाठवलेल्या अंतिम वसुली नोटीस व सीलिंग पंचनाम्यांनुसार इचलकरंजी महानगरपालिकेकडे तब्बल ₹२३,६५,६९,१३६/- इतकी अवाढव्य पाणीपट्टी थकबाकी प्रलंबित आहे. मूळ कराराचा भंग करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल थकवून नवीन प्रकल्पाचा घाट घालणे बेकायदेशीर असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मधील कलम ७ व ८ नुसार ग्रामसभेचे अधिकार सर्वोच्च आहेत. जुने दानवाड, नवे दानवाड, सैनिक टाकळी, दत्तवाड आणि घोसरवाड या बाधित ग्रामपंचायतींनी या योजनेविरोधात एकमुखाने विरोधी ठराव संमत केले आहेत. कोणत्याही ग्रामपंचायतीची नाहरकत (NOC) नसताना हा प्रकल्प लादणे लोकशाहीच्या तत्त्वांविरोधात आहे.

उन्हाळ्यात कृष्णा-पंचगंगा नदी पात्रातून अतिरिक्त ८९ MLD पाणी उपसा केल्यास स्थानिक शेतीचा पाणीपुरवठा खंडित होऊन पिके वाळतील व तीव्र टंचाई निर्माण होईल. तसेच पावसाळ्यात अलमट्टी व हिप्परगी बॅकवॉटरमुळे निर्माण होणाऱ्या महापुरात या योजनेचे संभाव्य बांधाकाम नदी पात्रात झाल्यास भीषण महापुर निर्माण होण्याचा धोका तांत्रिक दृष्ट्या संभवतो.

इचलकरंजी पालिकेची ८९ MLD ‘राधाकृष्ण पाणी पुरवठा योजना’ तात्काळ व कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी.
जुन्या आरक्षणाची ₹२३.६५ कोटींची थकीत पाणीपट्टी वसूल होईपर्यंत आणि बाधित सर्व ग्रामपंचायतींचे कायदेशीर NOC/ठराव मिळेपर्यंत या प्रकल्पाच्या DPR, टेंडर किंवा कोणत्याही कामास प्रशासकीय मंजुरी देऊ नये.
थकीत पाणीपट्टी प्रकरणी इचलकरंजी महानगरपालिकेवर कडक कायदेशीर कारवाई करून उच्चस्तरीय चौकशी लावावी. आदी मागण्यां करिता
आज, गुरुवार दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता नवे दानवाड येथील मारुती मंदिर समोर राधाकृष्ण जल सत्याग्रह बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले
या आंदोलनात पँथर आर्मी प्रमुख संतोषदादा आठवले,
नवे दानवाडचे लोकनियुक्त सरपंच डॉ. सी. डी. पाटील, माजी सरपंच सुकुमार पाटील (जुने दानवाड), प्रकाश परिट, संजय धनगर, खंडेराव चव्हाण, ॲड. राहुलराज कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सज्जनसिंग रजपूत, कुमार रजपूत सर, शिवानंद माळी, श्रावण कांबळे, शिवसेना (उबाठा) विभाग प्रमुख भगतसिंग शिलेदार,
राष्ट्रीय काँग्रेसचे शिरोळ तालुका उपाध्यक्ष दिनेश कांबळे , यांच्यासह ‘राधाकृष्ण संगमभूमी जल आक्रोश समिती’ चे सदस्य , ग्रामस्थ , शेतकरी , पशुपालक , कृषी पंपधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत .

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *