सरकारी रुग्णालयांतील औषध तुटवडा व सीपीआरमधील तोडफोडीची चौकशी करा; बाळासाहेब बेलेकर यांची मागणी

सरकारी रुग्णालयांतील औषध तुटवडा व सीपीआरमधील तोडफोडीची चौकशी करा; बाळासाहेब बेलेकर यांची मागणी

सरकारी रुग्णालयांतील औषध तुटवडा व सीपीआरमधील तोडफोडीची चौकशी करा; बाळासाहेब बेलेकर यांची मागणी

कोल्हापूर,दि. १५ (प्रतिनिधी) छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालय, तसेच जिल्ह्यातील ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सध्या आवश्यक औषधे आणि वैद्यकीय साहित्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. औषध खरेदीसाठी सुमारे साडेसहा कोटी रुपये शिल्लक असतानाही केवळ प्रशासकीय गोंधळामुळे खरेदी प्रक्रिया रखडली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बेलेकर यांनी केला आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे गरीब व सर्वसामान्य रुग्णांना औषधांसाठी नाहक भटकंती करावी लागत असून, रुग्णालयांमध्ये साधी सलाईन आणि शुगर तपासणीची पट्टीही मिळेनाशी झाली आहे.
औषध भांडारातील पूर्वीच्या कारभाऱ्यांची तडकाफडकी बदली करून नवीन फार्मसिस्टची नियुक्ती झाल्यापासून हा औषध खरेदीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित फार्मसिस्टला तातडीने निलंबित करून औषध पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी बेलेकर यांनी केली आहे. दुसरीकडे, काही महिन्यांपूर्वीच उद्घाटन झालेल्या सीपीआर रुग्णालयाच्या अपघात विभागाच्या नूतनीकरणाच्या नावाखाली तेथील चांगले फर्निचर तोडून रस्त्यावर फेकण्यात आले आहे. जनतेच्या पैशांचा हा मोठा अपव्यय असून ही तोडफोड नेमकी कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आली, याचा हिशोब प्रशासनाने जाहीर करावा.
राज्याचे आरोग्यमंत्री इतर जिल्ह्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या प्रकरणांत तातडीने निलंबनाची कारवाई करतात; मग कोल्हापुरातील औषध खरेदी आणि पुरवठ्याच्या प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा थेट सवाल बेलेकर यांनी उपस्थित केला आहे. जिल्ह्यातील रुग्णालयांना तातडीने औषध पुरवठा करावा, औषध खरेदीतील अडथळे दूर करावेत आणि या संपूर्ण गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *