राधाकृष्ण ८९ MLD योजना’ कायमस्वरूपी रद्द करा; २२ ऑक्टोबरपासून ‘राधाकृष्ण जल सत्याग्रह’ बेमुदत धरणे आंदोलन!

राधाकृष्ण ८९ MLD योजना’ कायमस्वरूपी रद्द करा; २२ ऑक्टोबरपासून ‘राधाकृष्ण जल सत्याग्रह’ बेमुदत धरणे आंदोलन!

‘राधाकृष्ण ८९ MLD योजना’ कायमस्वरूपी रद्द करा; २२ ऑक्टोबरपासून ‘राधाकृष्ण जल सत्याग्रह’ बेमुदत धरणे आंदोलन!

विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांना ‘राधाकृष्ण संगमभूमी जलआक्रोश समिती’तर्फे निवेदने सादर

दानवाड (प्रतिनिधी):
इचलकरंजी महानगरपालिकेची प्रस्तावित अवाजवी व गैरकायदेशीर ‘जुने दानवाड उद्भव राधाकृष्ण ८९ MLD पाणी पुरवठा योजना’ कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी, तसेच महापालिकेची थकीत पाणीपट्टी वसूल करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी दानवाड पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि ‘राधाकृष्ण संगमभूमी जलआक्रोश समिती’च्या वतीने गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर २०२६ पासून नवे दानवाड येथे बेमुदत ‘राधाकृष्ण जल सत्याग्रह’ धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भातील आंदोलनाचे निवेदन सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता महादेव कदम, शिरोळच्या नायब तहसीलदार क्रांती पाटील, दानवाडचे तलाठी, ग्रामसेवक, इचलकरंजी महानगरपालिका प्रशासन तसेच कुरुंदवाड पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहे.
प्रमुख आक्षेप व मागण्या:

  • २३.६५ कोटींची पाणीपट्टी थकबाकी:
    सांगली पाटबंधारे विभागाच्या दि. २९/०३/२०२५ च्या नोटीसनुसार इचलकरंजी महानगरपालिकेकडे रु. २३,६५,६९,१३६/- (अक्षरी: तेवीस कोटी पासष्ठ लाख एकोणसत्तर हजार एकशे छत्तीस रुपये) इतकी अवाढव्य पाणीपट्टी थकबाकी प्रलंबित आहे. मूळ कराराचे उल्लंघन करून आणि शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल थकवून नवीन ४३०.१० कोटी खर्चाचा DPR बनवणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
  • ग्रामसभांच्या ठरावांची व NOC ची पायमल्ली:
    महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ नुसार बाधित ग्रामपंचायती (जुने दानवाड, नवे दानवाड, सैनिक टाकळी, दत्तवाड, घोसरवाड) यांच्या ग्रामसभांनी या योजनेविरोधात एकमुखाने कायदेशीर ठराव संमत केले आहेत. कोणत्याही ग्रामपंचायतीची ‘नाहरकत प्रमाणपत्र’ (NOC) नसताना हा प्रकल्प लादला जात असल्याचा आरोप निवेदनात केला आहे.
  • दुष्काळ व महापुराचे दुहेरी संकट:
    उन्हाळ्यात कृष्णा-पंचगंगा नदीपात्रातून ८९ MLD इतका अतिरिक्त पाणी उपसा केल्यास स्थानिक हजारो हेक्टर शेतीचा पाणीपुरवठा खंडित होऊन भीषण दुष्काळ पडेल, तर पावसाळ्यात अलमट्टी व हिप्परगी बॅकवॉटरमुळे महापुराचा धोका अधिक गंभीर होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
    २२ ऑक्टोबरपासून बेमुदत धरणे आंदोलन:
    प्रशासनाने या जनविरोधी योजनेस तात्काळ स्थगिती देऊन ती कायमस्वरूपी रद्द न केल्यास गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजल्यापासून हनुमान मंदिरासमोर, नवे दानवाड (ता. शिरोळ) येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण नैतिक व कायदेशीर जबाबदारी संबंधित प्रशासन आणि इचलकरंजी महानगरपालिकेची राहील, असा इशारा समितीने दिला आहे.
    निवेदन प्रसंगी पॅंथर आर्मी प्रमुख मा. संतोषदा आठवले, शिरोळ तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष मा. दिनेश कांबळे यांच्यासह ‘राधाकृष्ण संगमभूमी जल आक्रोश समिती’चे पदाधिकारी, समन्वयक व दानवाड पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *