गांधीनगर ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र हेगडे अपात्र-
जिल्हाधिकारी
गांधीनगर, दि. २१ (प्रतिनिधी) (करवीर) येथील गांधीनगर ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र भीमराव हेगडे यांचे नगर भूमापन क्रमांक २४३८ मध्ये शासकीय जमिनीवर अतिक्रमण असल्याने व तसे स्पष्ट झाल्याने त्यांना अपात्र केल्याचा आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिला.
नानक शामलाल सुंदरानी व रितू हरेशलाल लालवानी (दोघेही रा. गांधीनगर) यांच्या अर्जावरून ग्रामपंचायत अधिनियमानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश पारित केला. हा निर्णय मान्य नसल्यास पुणे विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे पंधरा दिवसांच्या आत अपील दाखल करावे, असेही आदेशात नमूद केले आहे.