कोल्हापूर, दि. 22 (जिमाका): जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे व औद्योगिक शांतता प्रस्थापित करण्याकरीता करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉन्फरन्स हॉल, पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर येथे बैठक संपन्न झाली.
यावेळी औद्यागिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी औद्योगिक क्षेत्रातील अतिक्रमणांची माहिती घेवून इतर अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या. डॉ. बी. धीरजकुमार (भा. पो. से) अपर पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी त्यांच्या सर्व समस्या जाणून घेवून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याची हमी देवून संबधित उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.
बैठकीस डॉ. बी. धीरजकुमार (भा.पो.से.) अपर पोलीस अधीक्षक, प्रविण खानापुरे पोलीस निरीक्षक जिविशा, इराप्पा नाईक कार्यकारी अभियंता, उमेश देशमुख प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्यौगिक विकास महामंडळ कोल्हापूर, यशवंत हुंबे सरकारी कामगार अधिकारी, विकास कुलकर्णी उद्योग अधिकारी, अभिजीत कुलकर्णी, उप रचनाकार राजू पाटील अध्यक्ष शिरोली एमआयडीसी असोसिएशन, संजय जोशी अध्यक्ष मॅन्युफॅक्चरींग असोसिएशन तसेच इतर औद्योगिक क्षेत्रातील पदाधिकारी तसेच व्ही.सी. व्दारे सुजीतकुमार क्षीरसागर उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर, समीरसिंह साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी, डॉ. रोहिणी सोळंके उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर, रामदास इंगवले उपविभगीय पोलीस अधिकारी गडहिंग्लज त्याचबरोबर, हातकणंगले, शहापूर, हुपरी, गडहिंग्लज, चंदगड, आजरा, कागल, शिरोली MIDC, गोकुळ शिरगांव, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच कोल्हापूर व इचलकरंजीचे पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक उपस्थित होते.
0000