शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

कै. बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचा सर्वात मोठा सामाजिक उपक्रम मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा छ. शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संस्थापक अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन आण्णासाहेब हवले उपाध्यक्ष, चिकोडी जिल्हा क्रॉग्रेस कमिटी, मा.जि.प सदस्य बोरगांव, प्रा सुकुमार कांबळे अध्यक्ष डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया
यांच्या हस्ते करण्यात आले. छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीकांत शेवाळे संस्थापक अध्यक्ष आचार्य प्रतिष्ठान पोदार जंबो किड्स इस्लामपुर यांच्या हस्ते करण्यात आले. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ अमर कांबळे नालंदा विद्यापीठ अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्वराज्य क्रांती सेना या नविन संस्थेचे उद्घाटन सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांनी केले.
त्यावेळी डॉ सुमित्रा पाटील, यशस्वी उद्योजिका कोल्हापुर, दत्तात्रय पाटील, ॲड सुदर्शन तम्मन्नवर चिकोडी, ग्राम विकास अधिकारी प्रकाश धनगर, जीवन पम्मार समाज कल्याण अधिकारी, डॉ गुणवंत मंजु फिल्म डायरेक्टर बेंगळुरू, चंद्रशेखर अमिगंड नॅशनल वर्कर, धारवाड उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक डॉ प्रकाश कदम सर म्हणाले की शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था गेली अनेक वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत आहे. रक्तदान शिबीर, महाआरोग्य शिबीराचे आयोजन, गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गरजु विद्यार्थ्यांचे शालेय फी भरणे, संगणक प्रशिक्षण मोफत देणे, गरजु महिलांना साड्या वाटप करणे, अनेक अनाथ आश्रमांना भेट देवुन अन्नधान्य, शालेय साहित्य, साड्या, आर्थिक मदत करणे, कवी संमेलन, मराठी साहित्य संमेलन भरवणे, व्रुक्षारोपण करणे, जेथे अन्याय होत असेल तेथे आंदोलन करणे, गावातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी डॉ.विक्रम शिंगाडे नेहमी पुढाकार घेऊन कार्य करत असतात. तसेच सर्वात मोठा उपक्रम म्हणजे मोफत सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा दरवर्षी उत्साहात साजरा करत असतात असे अनेक उपक्रम ही संस्था राबवत असते. असे ते म्हणाले
आण्णासाहेब हवले म्हणाले की डॉ. विक्रम शिंगाडे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यांच्या सर्व सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमी आम्ही त्यांच्या पाठीशी असु असे ते म्हणाले.
श्रिनिवास नवले बॅंक व्यवस्थापक, बॅंक ऑफ बरोदा बेडकिहाळ म्हणाले की डॉ.विक्रम शिंगाडे यांंचे कार्य सर्वांनी प्रेरणा घेण्यासारखे आहे. डॉ विक्रम शिंगाडे यांच्या सारखे कार्य सर्वांनी केले तर समाजमध्ये नक्कीच प्रगती होईल असे ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणामध्ये प्रा डॉ अमर कांबळे म्हणाले की डॉ विक्रम शिंगाडे आज पाच जोड्यांचे मोफत विवाह करुन देत आहेत. फक्त पाच जोंड्यांचे नाही तर पाच लाख लोकांचे आशिर्वाद त्यांना लाभेल. तसेच या पाच जोड्यांना मार्गदर्शन करत म्हणाले की आज विवाहबंधनात अडकणार आहात तर सर्वांनी सुखात संसार करा. व आपल्या आईवडिलांना मानसन्मान द्या. आपल्या आईवडिलांचे आदर करा. असे ते म्हणाले.
अनेक मान्यवरांनी डॉ. विक्रम शिंगाडे यांच्या कार्याचे कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले.
सामुदायिक विवाह सोहळ्यातील जोड्या सविता माविनकट्टी मुन्नोळी, अक्षय हेरलगे बोरगांव, सुप्रिया गजरे बोरगांव, राकेश कांबळे सावर्डे, तन्वी माळगे भोज, गणेश आदमाणे भोज, वैष्णवी कांबळे कोल्हापूर, सुशिल डोंगरे कोल्हापूर, पुनम कांबळे कोल्हापूर, चेतण कांबळे बोरगांव या पाच वधु वरांचे हिंदू विवाह पद्धतीने विधीवत कन्यादान करुन थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला.
त्यावेळी आनंद काळे, आर.जी डोमणे, सुहास डोमणे, अशोक भंडारकर, भारत माळगे, अशोक झेंडे, तात्यासाहेब केस्ते, तुषार कांबळे, दादासाहेब पाटील, विनायक पाटील, संतोष आठवले, अशोक माळगे, प्रा बी एस नाडकर्णी, सुधाकर माने, वसंत बाबर, जीवन यादव, महावीर पाटील, नेताजी गोरे, शिरीष कांबळे, अरूण यादव, निलेश सनदी आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम दि-20 रोजी देशभक्त रत्नाप्पाना कुंभार सभागृह बी एस कंपोजिट कॉलेज बेडकिहाळ येथे हजारोंच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आभार ॲड सुदर्शन तम्मन्नवर यांनी मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *