मीडिया लाईव्हचे कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या कार्याला माझा सलाम _ अँड अय्युब शेख : पत्रकारांनी सत्य जनतेसमोर आणणे काळाची गरज.. फिरोज मुल्ला (सर )

मीडिया लाईव्हचे कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या कार्याला माझा सलाम _ अँड अय्युब शेख : पत्रकारांनी सत्य जनतेसमोर आणणे काळाची गरज.. फिरोज मुल्ला (सर )

प्रेस मीडिया लाईव्हचे कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या कार्याला माझा सलाम _ अँड अय्युब शेख

पत्रकारांनी सत्य जनतेसमोर आणणे काळाची गरज.. फिरोज मुल्ला (सर )

प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर.. प्रेस मीडिया लाईव्हच्या 5 व्या वर्धापण दिनानिमित्त राष्ट्रीय पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम माजी नगरसेवक मा. आयुबभाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला एकूण 60 मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणात अँड अय्युब शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की प्रेस मीडिया लाईव्ह चे उल्लेखनीय असून ते पत्रकारितेच्या माध्यमातून पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे ते काम करतात हे काम तितके सोपे नाही , खरोखरच मेहबूब सर्जेखान यांचे काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याला माझा सलाम..

या कार्यक्रमाचे आयोजन प्रेस मीडिया लाईव्हचे मुख्य संपादक महेबूब सर्जेखान यांनी केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सिने अभिनेत्री पदमजा खटावकर , कोल्हापूर मुस्लिम बोर्डिंगचे कादरभाई मलबारी, शांताई ट्रसचे अध्यक्ष बापूसाहेब कांबळे, मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य रिपाई (सचिन खरात गट )व पत्रकार फिरोज मुल्ला (सर ) आदी मान्यवर उपस्थित होते

या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती फिरोज मुल्ला (सर ) आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आता सध्याकाळाची गरज आहे की पत्रकाराने निर्भीडपणे पत्रकारीता केली पाहिजे परंतु दुर्दैव अस आहे की खर लिहिले आणि सत्य जनतेसमोर आणले की त्या पत्रकारला सरकारच्या दबावाखाली होणाऱ्या कारवाईला घाबरून गप्प बसाव लागत आहे पण घाबरून चालणार नाही त्याला निर्भीडपणे त्यास लिहावं लागेल जनतेला जागृत करून असत्यच्या विरुद्ध सत्य बोलायला ताकत दिली पाहिजे आणि आता तर खोटा इतिहास खोटं लिखाण आणि फक्त हिंदू मुस्लिम या विषय कडून जनतेची दिशाभूल केली जाते जनतेचे खरे प्रश्न महागाई, युवक बेरोजगारी, शैक्षणिक, आर्थिक, मुलीवर महिलेवर अन्याय अत्याचार रोज होतायत यावर सरकार गंभीर विचार करत नाही त्यामुळे जनता अजूनही सरकार कडून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे पण न्याय मिळत नाही तोपर्यंत जनतेला संविधानिक मार्गाने लडावं लागेल बोलाव लागेल गप्प बसून चालणार नाही आपण लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारले पाहिजे आपला भारत देश संविधानाने चालतो आणि त्याला जपण प्रत्येक भारतीय नागरिकांच कर्तव्ये आहे अशा प्रकारे महत्वाच्या विषयावर जनतेसमोर आपले मनोगत व्यक्त केले

कार्यक्रमाचे प्रमुख दैनिक अप्रतिम चे संपादक रविराज ऐवळे यांनी प्रेस मीडिया लाईव्ह च्या कामाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या

दैनिक गगनगिरी चे संपादक श्री सुभाष भिके कोल्हापूर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की पत्रकारिता करणे तेवढे सोपे राहिलेले नाही, पांढरा हत्ती पोसल्यासारखे आहे , पत्रकारितेचे काम करत पुरस्कार चे कार्यक्रम घेऊन त्यांना ऊर्जा देण्याचे प्रेस मीडिया लाईव्ह करत आहे , आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी सद्दैव उभे राहू असे श्री सुभाष भिके यांनी सांगितले.

कोल्हापूर मुस्लिम बोर्डिंग चे प्रशासक श्री कादर मलबारी यांनी प्रेस मीडिया लाईव्हच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले ते म्हणाले की मेहबूब सर्जेखान जे प्रत्येक वर्षी पुरस्कार वितरण सोहळा चे कार्यक्रम घेतात ते उल्लेखनीय आहे. आम्ही सद्दैव त्यांच्या पाठीशी उभे राहू

सिने अभिनेता श्री महम्मद रफिकमांगुरे मांगुरे यांनी प्रेस मीडिया लाईव्ह च्या कामाचे कौतुक करून त्यांनी या वेळी संपादक मेहबूब सर्जेखान यांच्या जुन्या आठवणी सांगितल्या , इचलकरंजीतून पुणे येथे जाऊन मीडिया क्षेत्रात राहून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपले नाव केले आहे आम्हा सर्व इचलकरंजीकराना त्याचा अभिमान आहे

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन . दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार मिलिंद देशपांडे यांनी केले. , पाहुण्यांचे स्वागत सौ. प्रमोदिनी माने यांनी केले या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम पुणे एक्सप्रेसचे पश्चिम महाराष्ट्र संपादक श्रीकांत कांबळे , प्रेस मीडिया लाईव्ह च्या पश्चिम महाराष्ट्र संपादिका सौ. प्रमोदिनी माने जाहिरात प्रतिनिधी , सो अनिता पाटील , कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी कांबळे यांनी घेतले. शेवटी आभार प्रेस मीडिया लाईव्ह चे संपादक मेहबूब सर्जेखान यांनी मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *