पहेलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटी कडून जाहीर निषेध व मृत पावलेल्या पर्यटकांना भावपूर्ण आदरांजली
चोपडा /प्रतिनिधी/आज चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दि.25 एप्रिल 2025 वार शुक्रवार रोजी दुपारी ठीक 04:00 वाजता जन शिक्षण संस्थानच्या प्रांगणात जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष भैय्यासाो.अँड.संदीप सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेल्याने जग हादरले असून सदरील घटना अत्यंत क्रूर व निंदनीय आहे सदरील घटनेचा चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध व्यक्त करून तसेच सदरील घटनेत प्राण गमावलेल्या निष्पाप पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आले, याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री.सुरेश सिताराम पाटील,तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे,शहराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक नंदकिशोर सांगोरे,चोसाका व्हाईस चेअरमन श्री.गोपाल धनगर, सूतगिरणी संचालक श्री.के.डी.चौधरी,श्री.राजेंद्र पाटील,श्री.सुनील बागुले,अँड.एस.डी.पाटील, वजाहत अली काझी, शेतकी संघाचे व्हाईस प्रेसिडेंट श्री बाळकृष्ण शंकरराव सोनवणे, चोसा का संचालक श्री शिवाजी अभिमन देसले,शेख आरिफ शेख सिद्दिकी,श्री युवराज शालिग्राम पाटील,श्री मोहन देवराम पाटील, श्री रमाकांत सोनवणे, श्री.यशवंत खैरनार श्री महबूबखाँ पठाण आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
………………. …. …………………………… क
Posted inजळगांव
पहेलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटी कडून जाहीर निषेध व मृत पावलेल्या पर्यटकांना भावपूर्ण आदरांजली
