चोकाकच्या गुरुकुल विद्यालयाची 100% निकालाची परंपरा कायम
आदर्श प्रीतम मुळीक केंद्रात प्रथम 96.60%

हातकणंगले तालुक्यातील चोकाक येथील गुरुकुल विद्यालय चोकाक चा इयत्ता दहावीचा 100% निकाल लागला आहे यामध्ये आदर्श प्रीतम मुळीक हा विद्यार्थी केंद्रात प्रथम आला आहे ज्ञानसंस्कार फौंडेशन चोकाक संचालित गुरुकुल विद्यालय ज्यूनी कॉलेज या शाळेचा सलग सात वर्षे 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे विद्यालयाने कायमच शैक्षणिक गुणवत्तेमध्ये आपल्या यशाची मोहर उमटवली आहे,सातत्याने लाभतं असलेलं यशाची सर्वत्र चर्चा व कौतुक होताना दिसून येत आहे, यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये, अनुक्रमे
आदर्श प्रीतम मुळीक 96.60%, अदिती विशाल फडतारे 94.60% प्रथमेश गणपती नरुटे 93.80% वैष्णवी विजय फडतारे 91.00% निरंजन बाजीराव साजने 90.20% अनुष्का अमोल पाटील 85.80% संकेत यशवंत माळी 81.60% या सर्वांचा समावेश आहे तसेच बाकीचे सर्वच विद्यार्थी यांनी विशेष प्रवीण्य मिळवले आहे यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थापक अध्यक्ष श्री प्रवीण माळी सर मा. उपसरपंच चोकाक, मुख्याधिपीका स्वप्नाली इंगवले, वर्गशिक्षिका स्वाती चोकाककर, श्री विनायक चव्हाण सर, सौ वृषाली सावंत, सौ अमृता मगदूम यांचे व इतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
