
कोल्हापूर, दि. १३ (प्रतिनिधी) भारतीय स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट चे औचित्य साधून राज्य उत्पादन शुल्क एक्साईज विभागातील गुन्हा अन्वेषण मध्ये उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल एक्साईज महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागीय भरारी पथकाचे सीनियर इन्स्पेक्टर किरण पवार, एक्साईज कागल विभागाचे सीनियर इन्स्पेक्टर शंकर आंबेरकर, एक्साईज शाहूवाडी विभागाचे सीनियर इन्स्पेक्टर किरण बिरादार यांना धर्मदाय संस्था नोंदणीकृत परिवर्तन फाउंडेशन च्या वतीने प्रोबस क्लबचे विद्यमान अध्यक्ष दिगंबर कुलकर्णी, फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कुरणे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थित गौरवण्यात आले.

याप्रसंगी एक्साईज कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाचे इन्स्पेक्टर सदानंद मस्करे, कॉन्स्टेबल राजेंद्र कोळी, जवान मारुती पोवार, फाउंडेशनचे कार्याध्यक्ष राज कुरणे, संस्थेचे संचालक रौनक धनवडे आदी मान्यवर उपस्थित होते.