पुणे (प्रतिनिधी)
गोरान ग्रॉसकोफ फॅमिली क्लिनिक तर्फे पोलिओ लसीकरण कार्यक्रम संपन्न
दिनांक १२ ऑक्टोबर रोजी एफ पी ए आय च्या गोरान ग्रॉसकोफ फॅमिली क्लिनिकने उपराष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता.
केळेवाडी, वारजे, चांदणीचौक , पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, बालेवाडी, आणि फिरता दवाखाना यामार्फत ५ वर्षांखालील एकूण १२५३ मुलांना पोलिओ डोसेस देण्यात आले. पोलिओ सारख्या आजारापासून मुलांचे संरक्षण व्हावे यासाठी दरवर्षी संस्था कार्यरत असते.
पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या विविध विभागातील हॉस्पिटल्सनी पोलिओ डोसेस पुरविण्यास मदत केली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संपूर्ण जी जी एफ सी टीम आणि प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे आभार .

