💐 स्व. वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन 💐
मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सहकार महर्षी स्व. वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज, गुरुवार, दिनांक 13 नोव्हेंबर, 2025 रोजी विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती मा. डॉ. (श्रीमती) नीलम गोऱ्हे यांनी स्व. वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
प्रमुख अधिकाऱ्यांकडून अभिवादन
याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-1 श्री. जितेंद्र भोळे, मा. उप सभापती यांचे खाजगी सचिव श्री. अविनाश रणखांब, अवर सचिव (समिती) श्री. सुरेश मोगल, संचालक, वि. स. पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी श्री. निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्व. वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
महाराष्ट्राच्या विकासातील वसंतदादांचे योगदान
स्व. वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राज्याच्या कृषी, सहकार आणि शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले. ‘सहकार महर्षी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंतदादांनी सामान्य जनतेच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, ज्यामुळे ते आजही जनतेच्या स्मरणात आहेत.
मा. उप सभापतींच्या नेतृत्वाखालील अभिवादन समारंभ
विधान भवनात झालेल्या या अभिवादन समारंभात, सर्व उपस्थितांनी स्व. वसंतदादा पाटील यांच्या कार्याला उजाळा देत कृतज्ञता व्यक्त केली.
Posted inमुंबई
स्व. वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन
