गरिबीतून संघर्ष करत सानिका कुरणे हिची BPM पदावर निवड; ग्रामस्थांकडून सत्कार

गरिबीतून संघर्ष करत सानिका कुरणे हिची BPM पदावर निवड; ग्रामस्थांकडून सत्कार


गरिबीतून संघर्ष करत सानिका कुरणे हिची BPM पदावर निवड; ग्रामस्थांकडून सत्कार

मजकूर:
निपाणी तालुक्यातील सिदनाळ (जि. बेळगावी) येथील सानिका कुरणे हिने अत्यंत गरीब व प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत Branch Post Master (BPM), सुरुपली पोस्ट ऑफिस येथे यश मिळवले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे गावाचे व समाजाचे नाव उंचावले आहे.

सानिका ही सध्या अभियांत्रिकी (Engineering) शिक्षण घेत असून, शिक्षणाबरोबरच तिने कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तिचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पुढे आणखी मोठ्या पदावर काम करण्याचे तिचे ध्येय आहे.

तिच्या या यशाबद्दल दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 8 वाजता गावातील युवकांनी एकत्र येऊन तिचा सत्कार आयोजित केला. या कार्यक्रमाचे आयोजन संग्रजकुमार वराळे पंकज वराळे, संदीप मधाळे, ओंकार कांबळे संतोष वराळे, सौरभ विभुते, बच्चन गुडिमणी, अमोल भोसले आणि दीपक वराळे यांनी केले.

यावेळी उपस्थितांनी सानिकाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत तिच्या यशाचे कौतुक केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *