महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने 30 नोव्हेंबर रोजी कामगार मंत्री श्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले. निवेदन संदर्भात त्यांनी असे आश्वासन दिले आहे की महाराष्ट्रातील बांधकाम कामगार मागण्यांच्या बाबत कामगार संघटनांची बैठक लवकरच घेण्यात येईल. त्यांनी शिष्टमंडळाबरोबर बोलताना असे स्पष्ट केले की पाच हजार रुपये बांधकाम कामगारांना बोनस देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे मत असे आहे की. फक्त बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस दिल्यास इतर असंघटित कामगारांच्या मध्ये नाराजी पसरते त्यांच्यावर अन्याय होतो म्हणून हे पाच हजार रुपये दिले जाणार नाहीत. तसेच कल्याणकारी मंडळामार्फत मुलीच्या विवाहासाठी 51000 रुपये देण्याच्या ठरावास व कामगाराचा मृत्यू झाल्यासवारसांना दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याबाबत शासन निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. शिष्टमंडळात कृती समितीचे निमंत्रक कॉ शंकर पुजारी सत्यशोधक कामवर संघटनांचे नेते सागर तायडे मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेचे नेते उस्मान शेख MDO शमसुद्दीन शेख यांचा शिष्टमंडळ यामध्ये समावेश होता. खालील मागण्यांचे निवेदन कामगार मंत्री श्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले.
(१) बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत दोन वर्षांपूर्वी नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी 51 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही महत्त्वाची कल्याणकारी योजना देशातील सर्व राज्यांच्या मध्ये लागू आहे. परंतु या निर्णयास अजूनही महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेली नाही. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत हा ठराव केलेल्या तारखेपासून बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहास 51 हजार रुपये देण्याचा आदेश सत्वर करावा.
(२)महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचे मार्फत तीन मार्च 2021 रोजी मंडळाकडे नोंदीत बांधकाम कामगारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा ठराव झालेला आहे या ठरावाला सुद्धा अद्यापही सहा महिने होऊन गेले तरी महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली नाही ही मंजुरी सत्वर देण्यात यावी.
(३) मागील वर्षी covid-19 व लॉक डावून मध्ये सर्व नोंदीत बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये कल्याणकारी मंडळ मार्फत आर्थिक सहाय्य दिले आहे . परंतु हे वर्ष संपत आले तरी अजूनही फक्त पंधराशे रुपयेच कल्याणकारी मंडळाकडून दिले आहेत. त्यासाठी उर्वरित साडेतीन हजार रुपये रक्कम बांधकाम कामगारांना त्वरीत मिळावी.
५) यावर्षी महाराष्ट्रामध्ये महापुराने हाहाकार माजलेला होता. यामध्ये हजारो बांधकाम कामगार महापूरग्रस्त आहेत. अनेक कामगारांची घरे पडून त्यांचा निवारा उध्वस्त झालेला आहे. अनेक बांधकाम कामगारांचा बळी गेलेला आहे. त्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे. सध्या नोंदीत बांधकाम कामगारांना देण्यासाठी महाराष्ट्र बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे बारा हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम शिल्लक आहे. महाराष्ट्रामध्ये महापुरात ज्या बांधकाम कामगारांची घरे पडलेली आहेत अथवा बाधित आहेत त्या कामगारांना तातडीने बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत घर बांधण्यासाठी असलेल्या योजनेअंतर्गत त्वरित अर्थसहाय्य करण्याबाबत आदेश करावा.
(५) 23 जुलै 2020 पासून महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत ऑनलाईन चे काम सुरू झालेले आहे. परंतु ऑनलाईन काम अत्यंत धीमेपणे सुरु आहे. तरी बांधकाम कामगारांच्या सोयीसाठी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धत सुरू करावी.
(६) बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे स्टाफ अत्यंत कमी असल्यामुळे आणि सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामध्ये पन्नास टक्के पेक्षा जास्त रिक्त पदे असल्यामुळे कामगारांची ऑनलाईन कामेसुद्धा अत्यंत संथगतीने सुरू आहेत.म्हणून ताबडतोबीने रिक्त पदे भरावीत
वरील निवेदन मंत्रि महोदयांना दिल्यानंतर मुंबई आजाद मैदान येथे उपस्थित बांधकाम कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक 30 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता झाली. या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की, कामगार मंत्री महोदयांनी कृती समिती प्रतिनिधी यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा केलेली आहे. मागण्या संदर्भात निर्णय सत्वर निर्णय होतील अशी अपेक्षा आहे असे न झाल्यास बांधकाम कामगार संघटना कृती समितीवतीने आझाद मैदान येथे गुरूवार 23 डिसेंबर पासून आंदोलन करण्याचा निर्णय करण्यात आला . असे पत्रक बांधकाम कामगार संघटना कृती समितीचे निमंत्रक कॉ शंकर पुजारी, व प्रतिनिधि साथी सागर तायडे. उस्मान शेख, शमसुद्दिन शेख, कॉ रमेश जाधव, व धनराज कांबळे यांनी प्रसिध्दीस दिले आहे