पारंपारिक विणकाम करणार्याना महाराष्ट्र कोष्टी समाज
सेवा मंडळ सहकार्य करेल : प्रकाशराव सातपुते
इचलकरंजी/प्रतिनिधी –
कोष्टी समाजाची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ व विटा सहकारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विटा यंत्रमाग सभागृहात पारंपारिक विणकाम करणार्या विणकरांच्या समस्या विचारविनिमय व उपाययोजन यांची चर्चा करण्यासाठी राज्यातील विविध क्षेत्रातील तज्ञांच्या उपस्थितीत ऑनलाईन वस्त्रोद्योग परिषद संपन्न झाली. राज्यातील इचलकरंजी, फलटण, विटा, कोल्हापुर, नाशिक, पुणे, मुंबईसह अनेक ठिकाणचे कोष्टी समाजाचे पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते.
या परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कोष्टी सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते होते. परिषदेच्या चर्चासत्रामध्ये वीजदर प्रश्नी वीजतज्ञ प्रताप होगाडे, निर्यात संधीबाबत पिडीक्सिल चे संचालक गजानन होगाडे, बँक क्षेत्रातील समस्यांबाबत इचलकरंजी जनता बँकेचे संचालक महेश सातपुते आणि विकेंद्रीत यंत्रमागसमोरच्या समस्या व उपाययोजनाबाबत इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतिश कोष्टी व विटा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी मार्गदर्शन केले.
विटा देवांग समाज अध्यक्ष दताभाऊ चोथे यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात महाराष्ट्र कोष्टी सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांनी, विणकाम व्यवसाय असलेल्या कोष्टी समाजाच्या पारंपारिक विणकाम क्षेत्रातील समस्या तसेच तत्सम विविध प्रश्न राज्य व केंद्र शासनाकडे प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी संघटीत प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे सांगितले.
यावेळी अंकुशराव उकार्डे, उत्तमराव म्हेत्रे, नितीन गजानन दिवटे, कोल्हापुर राजेंद्र ढवळे, सुरेश म्हेत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. या परिषदेचे नियोजन व तांत्रिक सहाय्य कोष्टी परिषदेचे मिलिंद कांबळे व शितल सातपूते यांनी पाहिले. सूत्रसंचालन कोष्टी समाज सेवा मंडळाचे महासचिव रामचंद्र निमणकर सर यांनी केले. या परिषदेस पुणे कोष्टी समाज अध्यक्ष सुरेश तावरे, सुनिल ढगे, अशोक भुते, भगवानराव गोडसे, दतात्रय ढगे, इचलकरंजीचे कोष्टी समाज अध्यक्ष विश्वनाथराव मुसळे, पत्रकार दयानंद लिपारे, मनोज खेतमर, अरुण वडेकर, सौ सुधाताई ढवळे, सौ. प्राजक्ता होगाडे, दिलीप भंडारे, विट्यातील वैभव म्हेत्रे शिवाजीराव कलढोणे, विनोद तावरे, नितीन तारळेकर, सचिन रसाळ राजु भागवत यांच्यासह अनेक यंत्रमाग व्यावसायिक उपस्थित होते. यानंतर सर्व सहमतीने केंद्र व राज्य शासनास सादर करावयाच्या निवेदनाचा मसुदा तयार करण्यात आला. पूर्ण दिवसभर चाललेल्या या परिषदेस अनेक मान्यवर ऑफलाइन व ऑनलाईन उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर