आय.जी.एम. हॉस्पिटल इचलकरंजीची आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी घेतली आढावा बैठक
इचलकरंजी- (विशेष प्रतिनिधी चंदुलाल फकीर) येथील आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी आय.जी.एम.हॉस्पिटल इचलकरंजीला भेट देऊन आढावा बैठक घेतली.राज्य सरकार मार्फत पंचावन्न कोटी रुपये मंजूर झालेल्या निधीतून अत्याधुनिक मशनरी उपलब्ध करून सुसज्ज असे हॉस्पिटल करावे. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना मोफत सेवा मिळालीच पाहिजे. हे हॉस्पिटल गव्हर्नमेंट हायटेक हॉस्पिटल व्हावे अशी आमदार प्रकाश आवाडे यांनी इच्छा व्यक्त केली. ओमिक्रोन या नव्या व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे डॉक्टर व आधीकारी यांना आदेश दिले.यावेळी आयजीएम चे डॉक्टर शेरखान, डॉक्टर महाडिक,कार्यकारी अभियंता एस.आर.पाटील, उपअभियंता यु.एस.करंडे, शाखा अभियंता सतीश शिंदे, विजय पाटील,आयजीएम कॉन्ट्रॅक्टर संकेत गांधी, सचिन गांधी, ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, नगरसेवक सुनील पाटील, प्रकाश सातपुते, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर,चंद्रकांत इंगवले उपस्थित होते.