शिवारात आणि डोळ्यांत पाणीच !

तुझं दुःख
तुझं संकट
तुझा हा उघडा संसार
सगळं उद्धवस्त झालंय
तरी तुझी संसार वाचवण्याची धडपड
खोपित आपलं अर्ध आयुष्य घालणारी तू
गुडघ्या एवढं भरलेलं पाणी
तरी झाडू घेऊन नव्याने कोरडं करायला निघालीस अंगण
रडत नाहीस
हरत नाहीस
आत्महत्या करत नाहीस
लढतेस, झुंज देतेस
कधी कुठेच तुझी तक्रार नाही
तुला नेता नाही
तुला संघटना नाही
तुझा कधी संप नसतो
75 वर्ष झालं तुला कारखान्यावर घर मिळालं नाही
तुझ्या खोपीचा ना आकार बदलला
तुझ्या खोपीचा ना कधी साईज बदलली
तशीच आहे तुझी न बदलेली कोप
कोपटांनी आयुष्य असं असुरक्षित केलं
तू स्वच्छ भारताच्या जाहिरातीतून बाहेर आहेस
तुला बाथरूम नाही कुणावरही कार्यवाही नाही
गुलाम केलं या सहकार सम्राटांनी तुला
सहकार मंत्रालय उघडलं तरी
तुझा एकही प्रश्न त्यांच्या यादीत नाही
तु मताच साधन आहेस
माणूस म्हणून तुला कधी यांनी बघितलंच नाही
तुझ्या घामाकडे बघणाऱ्या
या नालायक औलादी आहेत
तुझं सगळं शोषण येते होतं
तुझ्यावर अत्याचार होतो
बालविवाह करून तू येते आणलेली असतेस
तू चिमुटपणे दारुड्या नवऱ्याचा मार खात असतेस
मस्ताडलेल्या फड मालकाची
मस्ताडलेल्या मुकादमाच्या गुंडगिरीची शिकार झालेली असतेस
सामाजिक कार्यात तुझा मुद्दा नाही
तुझ्यासाठी येते विशेष अधिवेशन नाही
तुझ्यासाठी कोणतंच आयोग नाही
किती भयावह चित्र आहे
खोपी उद्धवस्त झाल्यात
सांग कुणी तरी आलंय का पंचनाम्याला
तुझ्या आयुष्याचा पंचनामा एकच
कोणत्याही परिस्तिथत फक्त राबायचं
कारखान्याच्या भोंग्यावर नाचायचं
थंडी अफाट
धुक्याची चादर
हुडहुडत, कुडकुडत
फडात घुसायचं
काठेरी पाचाराट चरर अंग कापून घेईचं
सरीत लेकरं टाकून बेभान होऊन उभं आडवं करत निघायचं
त्याला बांधायचं
डोक्यावर घेऊन चालायचं
पायात कधी कधी खनपुस घुसलं तरी तू चालत असतेस
खूप व्यथा आहे आहेत तुझ्या
तुझ्यावर कुणीही पीएचडी करत नाही
तुझ्यासाठी या देशात ड्रेस तयार होत नाही
तुला कामगार म्हणून दर्जा नाही
तुझी रोजंदारी फिक्स नाही
तुझया जगण्याची येते किंमतच नाही
केलास जरी संप
तरी तुझा गिरणी कामगार करू म्हणून इशारा दिला जाईल
कारखाने बंद करतील
घाणीतले डुक्कर पण तुला
कामगार म्हणून दर्जा देणार नाहीत

हे चित्र बघून कुणी हलणार नाही
तुझ्यासाठी करखान्यावर भाडे तत्त्वावर एक खोली तयार होणार नाही
वाहून गेला संसार तुझा
येते पंचनामा होणार नाही
तुझ्या लेकरांची कुणाला काळजी नाही
तुझा मुद्दा महिला आयोगात नाही
तुझं मानवी हक्काचं हनन येते मोजलं जात नाही
भोळी तू
भाबडी तू
तुझं दुःख कुणाला दिसत नाही
बघ जमलं तर बंड कर
थांबव ही ससेहोलपट
तुला घर दिलं
तुला बाथरूम दिलं तरच
कारखान्याला जा
हे जनावरी जीन थांबव
ह्रदयात काळीज नसलेली ही व्यवस्था आहे
त्यांच्या गार्डनमध्ये काम करणाऱ्याला
50 हजार पगार आहे
राहायला घर न बाथरूम आहे
त्यांचं कुत्रं सांभाळायला शासकीय माणसं आहे
ऊसतोड मारला जातोय
हेच सत्य आहे
राजकारण्यांना काळीज असेल तर
त्यांनी हे फोटो पाहवेत
आणि स्वतःला प्रश्न विचारावेत
कोण आहेत ऊसतोड
ते मराठी माणसं आहेत
ते वंजारी आहेत
ते बौद्ध आहेत
ते मराठा आहेत
ते मातंग आहेत
ते सर्व बहुजन आहे
समाजासाठी तरी बोला
कामगारांसाठी तरी भूमिका घ्या
पुढं या हतबल माणसांचा लढा लढा
दुःखद अंतकरणाने सांगतो
हे फोटो बघून पुरता हललो आहे

तुझं रक्त पितो आम्ही
गोड साखर खातो आम्ही
तू चिखलात संसार सावरतेस
आम्ही पाऊस पडलाय म्हणून
तुझ्या रक्तातून बनलेल्या साखरेचा
कडक चहा खिडकीत पाऊस बघत आम्ही पीत असतो
आम्हाला काय माहित तुझी कोप
तुझा उघडा संसार
आणि कशी तयार होते साखर?

  • दिपक केदार
    राष्ट्रीय अध्यक्ष,
    ऑल इंडिया पँथर सेना