विवेकानंद फाउंडेशन व बहुउद्देशीय संस्थेच्या पुढाकाराने कबनुर मधील १५ दिव्यांग बांधवांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळाले
कबनूर -(विशेष प्रतिनिधी चंदुलाल फकीर) छत्रपती प्रमिलाताई राजे हॉस्पिटल (सीपीआर) कोल्हापूर येथे अपंग बांधवांना प्रमाणपत्र देणे करता कॅम्प लावलेला होता. कबनूर मधील विवेकानंद फाउंडेशन व बहुउद्देशीय संस्थेने पुढाकार घेऊन कबनूर मधील १५ अपंग बांधवांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून देणे करीता मंडळाचे अध्यक्ष दत्ता शिंदे व मंडळाचे सदस्य यांनी विशेष प्रयत्न केले. याबद्दल कबनुर मधील नागरिक या बहुउद्देशीय मंडळाच्या हातून अशीच समाजोपयोगी कामे नेहमी घडत राहो अशी इच्छा व्यक्त करून त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करत आहेत.
Posted inकोल्हापूर