जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून कबनुर ग्रामपंचायतीमध्ये जागतिक प्रख्यात अंध महिला हेलन केलर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले

जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून कबनुर ग्रामपंचायतीमध्ये जागतिक प्रख्यात अंध महिला हेलन केलर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले


कबनूर-(विशेष प्रतिनिधी चंदुलाल फकीर)जागतिक अंध दिन दरवर्षी ३ डिसेंबरला जगभरात साजरा केला जातो. १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिन जाहीर केला.हा दिवस अपंग व्यक्ती बाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून कबनूर ग्रामपंचायतीमध्ये जागतिक प्रख्यात अंध महिला हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यानंतर महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळ व कबनूर ग्रामपंचायत मार्फत विठ्ठल मंदिर सभागृह कबनुर येथे अपंग बांधवांना टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु बनवण्याच्या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात आलेले होते.याच कार्यक्रमात प्रशिक्षणामध्ये भाग घेतलेल्या सर्व दिव्यांग बांधवांना प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र व चेकचे वाटप सरपंच सौ शोभा पोवार मॅडम, उपसरपंच सुधीर पाटीलसाहेब, सदस्य भय्यासाहेब जाधव,सदस्या श्रीमती रजनी गुरव,सौ सुधाराणी पाटील, सौ अर्चना पाटील, सौ रोहिणी स्वामी,ग्राम विकास अधिकारी जि.डी.आदलिंगसाहेब तसेच दिव्यांग कल्याण संघटनेचे सर्व पदाधिकारी दिव्यांग बांधव व ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.