आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात “हसत खेळत शिक्षण ” पुस्तक प्रकाशन.
प्रयोगशील प्राथमिक शिक्षिका चित्ररेखा रविंद्रनाथ जाधव यांच्या “हसत खेळत शिकणे” या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ कवयत्री मा. सुशिलाताई संकलेचा यांच्या हस्ते ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नाशिक येथे नुकतेच संपन्न झाले. साहित्यसंपदा मुंबई यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे यावेळी साहित्यिक अर्चना जौशी व संगिता थोरात व अ.भा. मराठी साहित्य संमेलन ग्रंथ प्रकाशन समितीचे मान्यवर सदस्य उपस्थित होते.
प्राथमिक शिक्षिका म्हणून काम करत असताना विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण देऊन त्यांचा अधिकाधिक उत्कर्ष कसा करता येईल,गुणवत्ता विकास करणे व खेड्यापाड्यातील तसेच वाडया – वस्ती वरील लहान मुले जेव्हा आईला सोडून प्रथमच शाळेत पाऊल टाकतात तेव्हा त्यांना शिक्षण बोजड अथवा अवघड न वाटता त्याच्या कलाने घेऊन शिक्षण प्रक्रिया कशी सोपी व आनंददायी होईल याविषयी आलेले अनुभव व त्यांनी केलेले प्रयोग यांचा खजिना म्हणजे हे शैक्षणिक पुस्तक आहे असे मनोगत अनेक मान्यवरांनी प्रकाशन सोहळ्यात काढले.