कोकण मार्गावर आता साप्ताहिक स्पेशल रेल्वेगाड्या

कोकण मार्गावर आता साप्ताहिक स्पेशल रेल्वेगाड्या

रत्नागिरी : नाताळ सुटीसह नववर्षाच्या स्वागतासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या ४ साप्ताहिक स्पेशल रेल्वेगाड्या १८ डिसेंबरपासून कोकण मार्गावर धावणार आहेत. दादर-थिविम, थिविम-पनवेल, पुणे-करमाळी, करमाळी-पनवेल या गाड्यांचा समावेश आहे. पूर्णपणे आरक्षित असणाऱ्‍या या गाड्यांच्या ४२ फेऱ्‍या धावणार असल्यामुळे पर्यटकांना कोकणात येणे सुकर झाले.

थिविम-पनवेल (०१२९०-०१२८९) आठवड्यातून तीन दिवस धावेल. १८ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत दर बुधवारी, शनिवारी व रविवारी थिविम येथून दुपारी १.३० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी पनवेलला परतीच्या प्रवासात दर गुरुवारी, रविवारी व सोमवारी रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी सुटून त्याच दिवशी दुपारी १ वाजता थिविमला पोहोचेल. पुणे-करमाळी स्पेशल (०१२९१/०१२९२) १७ ते ७ जानेवारीपर्यंत धावणार आहे. दर शुक्रवारी धावणारी ही गाडी पुणे येथून सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुटून दुसऱ्‍या दिवशी सकाळी ६ वाजता करमाळीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात दर रविवारी करमाळीतून सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी पुण्यात पोहोचेल. करमाळी- पनवेल (०१२९४/०१२९३) १८ डिसेंबर ते ८ जानेवारीपर्यंत दर शनिवारी धावेल.

करमाळी येथून सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री ८ वाजता पनवेलला पोहोचेल. पनवेल येथून शनिवारी रात्री १० वाजता सुटून सकाळी ६ वाजता करमाळीला पोहोचेल.१७ डब्यांच्या गाडीला रत्नागिरी, सिंधुदुर्गातही थांबेकोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्‍या गाड्यांमध्ये दादर-थिविम (०१२८७-०१२८८ ) साप्ताहिक स्पेशल १८ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत दर बुधवारी व शनिवारी धावेल. दादर येथून रात्री १२ वाजून ३५ मिनिटांनी दादरला पोहोचेल. १७ डब्यांच्या स्पेशल गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभवावाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी आदी थांबे आहेत.

आणखी नियमित गाड्यांना मुदतवाढ कोकण मार्गावर ३ नियमित गाड्यांना कोकण मार्गावरून धावणाऱ्‍या मांडवी कोकणकन्या एक्स्प्रेसपाठोपाठ आणखी नियमित गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. दिवा-रत्नागिरी, सावंतवाडी-मडगाव पॅसेंजर, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस १ डिसेंबरपासून पुढील सूचनेपर्यंत धावेल. सावंतवाडी-मडगाव नियमित पूर्णपणे अनारक्षित करण्यात आली आहे.