प्रबोधिनीत डॉ.आंबेडकर यांना अभिवादन
इचलकरंजी ता. ६ ,समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालयाच्यावतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला अन्वर पटेल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रसाद कुलकर्णी यांनी डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचे महत्व अधोरेखित केले. यावेळी पांडुरंग पिसे, नौशाद शेडबाळे, महेंद्र जाधव, दिगंबर उकिरडे, सर्जेराव पाटील ,दीपक पंडित,सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावी, अश्विनी कोळी,दीपक पाटील,जुबेर मोमीन आदी उपस्थित होते.