साथी हसन देसाई यांना अमृत महोत्सवी वर्षा निमित्याने २५ लाखाची थैली देवून नागरी सत्कार करणार – जेष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा
कोल्हापूर – प्रतिनिधी – माझी शाळा येथे जेष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांच्या अध्यक्षतेखाली साथी हसन देसाई यांचा अमृतमहोत्सव सत्कार करण्या करीता विचार विनिमय सभेचे आयोजन केले होते . प्रांरभी मीरासाहेब मगदूम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले . बाबा नदाफ यांनी साथी हसन देसाई यांचे जीवनकार्याचा परिचय करुन दिला . यावेळी मंचावर स्वातंत्र्य सेनानी माधवराव माने , अतुल दिघे , प्रा.शरद पाटील माजी आमदार , शहाजीबापू जाधव , एकनाथ जाधव , एस.एम. कांबळे , अशोक चौगुले , एम.एस. पाटोळे , अशोक पाटोळे , मोहन देशमुख , खादी स्वदेशी चळवळीचे सुंदर देसाई , मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक यांनी चर्चेत सहभाग घेवून मौलीक सुचना केल्या . त्यानंतर भरत लाटकर यांनी जेष्ठ नेते पन्नालाल सुराणा यांची साथी हसन देसाई अमृत महोत्सव नागरी सत्कार समितीच्या अध्यक्षपदी व मीरासाहेब मगदूम यांचे कार्याध्यक्ष पदी सर्वानुमते निवड झाल्याचे जाहिर केली . सर्वांनी टाळयाच्या गजरात संमती दिली व त्यांना सर्व समावेशक व सर्व डाव्या पक्षाचे सदस्य व पदाधिकारी यांना घेवून महाराष्ट्र राज्य व्यापी , साथी हसन देसाई अमृत महोत्सव नागरी सत्कार समिती , असे नांव देण्यात आले व सर्व समावेशक समिती निवडीचे त्यांना अधिकार दिले . साथी पन्नालाल सुराणा यांनी अध्यक्षीय मार्गदर्शक भाषण करुन म्हणाले , सर्वांच्या भावना व सुचना प्रमाणे साथी हसन देसाई यांना आपण सर्वजण व महाराष्ट्रभर असलेले त्यांचे चाहते मित्र व मान्यवर यांचेकडून देणगी व जाहिरात या रुपाने निधी जमवून त्यांना निवारा करुन दे