युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनी सम्यक विद्याथी आदोलन तांलुका संगमेश्वर यांचे अभिवादन

रत्नागिरी : 6 डिसेंबर 1956 रोजी एक महासूर्य मावळला.ज्ञानाची भूक भागवण्यासाठी पोटाची भूक मारणारा,विषमतेला जाळणारा,अन्यायाला भीडणारा एक वणवा शांत झाला.देशाच्या ओठावर समतेचे गीत देऊन विकासाची पेरणी करणारे परमपूज्य बोधिसत्व भारतीय संविधानाचे शिल्पकार,महामानव विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुष्पहार अर्पन करून विनम्र अभिवादन केले. यावेळी सम्यक विद्यार्थी आदोलन जिल्हा प्रमुख संघटक चेतन जाधव, संगमेश्वर तालुका प्रमुख संघटक रणजित पवार,रोहन घोलम,पुजा कांबळे,अतुल जाधव,रूपेश कांबळे,दिपक शिवगन वैभव पवार व ईतर सम्यकचे विद्यार्थी व भीमअनुयायी उपस्थित होते.