मुंबई : १० डिसेंबर मानवाधिकार दिननिमित्ताने दरवर्षी प्रमाणे यावर्षी हि केंद्रीय मानवाधिकार संघटना दिल्ली तर्फे ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन’ साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने १० डिसेंबर 20121 रोजी नागपूरला होत असलेल्या राष्ट्रीय संमेलन व सन्मान सोहळ्यामध्ये वरिष्ठ न्यायाधीश अभिजित देशमुख, पोलीस अधीक्षक संजय पांडे, मा. दिपक कदम , अँड संजय कुस्तवार (अधिवक्ता सुप्रिम कोर्ट ऑफ इंडिया, नई दिल्ली) यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. या पुरस्कारासाठी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील रहिवासी अमरकुमार आनंद तायडे यांना ‘मानवाधिकार रत्न पुरस्कार’ दिला जाणार आहे.
Posted inBlog