नागालँड गोळीबार हत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी आजाद समाज पार्टीची मागणी
नागालँड गोळीबार हत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी आजाद समाज पक्षाची मागणी
कोल्हापूर प्रतिनीधी : नागालँड राज्यातील मोन जिल्ह्यातील ओटिंगच्या तिरु गावातील नि:शस्त्र कोळसा खाण कामगारांची भारतीय सुरक्षा दलाकडून तेरा जणांची हत्या करण्यात आली याचा आजाद समाज पार्टी तीव्र निषेध करीत आहे या गोळीबार हत्येप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशां मार्फत चौकशी करून संबंधित अधिकारी व सुरक्षा जवानावर कठोर कारवाई करावी तसेच या हल्ल्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपये नुकसान भरपाई मिळावी नागालँड राज्यातील प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता भारतीय लष्कराला कारवाई करण्याचे जे विशेष अधिकार आहेत ते तात्काळ काढून घ्यावेत आदी मागण्यांचे निवेदन अॅडवोकेट चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वाखालील आजाद समाज पार्टीच्या वतीने कोल्हापूर निवासी जिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना देण्यात आले यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संतोष आठवले, उपाध्यक्ष अमोल कुरणे, जिल्हा महासचिव पृथ्वीराज कोडोलीकर, धनाजी कांबळे , दीपक शेडबाळे, फिरोज मुजावर ,श्रीनिवास लाड, सुर्यकांत देशमुख, स्वाती माजगावे, सचिन कांबळे आदी उपस्थित होते.