कोल्हापूर जिल्हा प्रमाणित लेखा परीक्षक असोसिएशन व महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह ऑडिटर्स महासंघ पुणे यांची संयुक्त बैठक गोकुळ दुध संघ कोल्हापूर येथे पार पडली
कोल्हापूर -(विशेष प्रतिनिधी चंदुलाल फकीर) गोकुळ दूध संघ कोल्हापूर येथे कोल्हापूर जिल्हा प्रमाणित लेखापरीक्षक व महाराष्ट्र राज्य को- ऑपरेटिव्ह महासंघ पुणे यांच्या दिनांक १३.१२.२०२१ रोजी झालेल्या संयुक्त बैठकीमध्ये लेखापरीक्षक यांना लेखापरीक्षण करण्यासाठी येणाऱ्या अडचणी तसेच ९७ व्या घटना रद्दबातल व त्यास अनुषंगाने माननीय सहकार आयुक्त साहेबांनी गठीत केलेली कायदा बदला बाबतची समिती व आपणास अपेक्षित असणारी महा. सहकारी कायदा १९६० व नियम १९६१ मधील अपेक्षित बदला बाबत चर्चा झाली.नव्याने स्थापन केलेल्या महासंघाचे महत्त्व सर्वांना सांगण्यात आले. असोशिएशनचे नियम न पाळणाऱ्या लेखापरीक्षकास सदरअसोसिएशन व महासंघ यांच्यामार्फत केलेल्या कामाचा लाभ घेता येणार नाही. लेखापरीक्षक यांना भविष्यातील येणाऱ्या अडचणीस असोसिएशन व संघ सहकार्य करणार नाही .नियम पाळणारे लेखापरीक्षक यांना भविष्यातील येणाऱ्या अडचणीस असोसिएशन व संघाचे सहकार्य राहील. याबाबत सदर सभेमध्ये चर्चा करून सर्वानुमते मंजुरी देण्यात आली .या बैठक प्रसंगी असोसिएशन मार्फत पुढील कामाचा आढावा असोशियशनचे अध्यक्ष व संघाचे कार्याध्यक्ष सुनील भोसले साहेब याने घेतला. संघटनेच्या कामाचा आढावा संघाचे सल्लागार ए. डी. मानेसाहेब यांनी घेतला. संघाचे संचालक श्री मनोज बागे यांनी महासंघाच्या उद्देशाचे वाचन केले .असोसिएशनचा जमाखर्च असोसिएशनचे सचिव विनायक पाटील यांनी वाचून दाखिवला. घटना दुरुस्ती बाबत कोणाला काही बदल सुचवायचे असतील तर असोसिएशनच्या कार्यालयात लेखी बदल पाठवून देणें बाबतचे आवाहान करण्यात आले . सदरच्या बैठकीस बहुसंख्य प्रमाणित लेखापरीक्षक हजर होते. सभेचे सूत्रसंचालन श्री घाडगे साहेब यांनी केले. शेवटी उपस्थित लेखापरीक्षक यांचे आभार मंगेश जाधव यांनी मानले.
Posted inकोल्हापूर