मलकापूर प्रतिनिधी:करण झनके
शासन प्रशासनाच्या माध्यमातून नोकरदार, व्यावसायिक, मजूर वर्ग तसेच समाजाच्या सर्व घटकांचे लसीकरण सक्तीने सुरु आहे. आणि लस न घेतलेल्यांच्या सुविधा खंडित करण्याचे काम सुरु आहे. काही कार्यालयात लस घेतल्याचे प्रमाणपत्र नसेल तर प्रवेश दिला जात नाही. काही ठिकाणी राशन मिळत नाही. कर्मचाऱ्यांचे पगार थांबवून ठेवले आहेत. रेल्वेने प्रवास करण्याची मुभा नाही. इत्यादी प्रकारे सामान्य जनतेला लस घेतली नसेल तर त्रस्त करण्याचे प्रकार शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून होत आहेत.
लसीकरण करने किंवा न करने हा वैयक्तिक विषय आहे त्याला सक्तीने राबवणे ही हुकूमशाही आहे.
कारण सक्ती करणे हे भारतीय संविधानाच्या कलम 14, 19 आणि 21 चे उल्लंघन आहे. जे मूलभूत अधिकाराचे हनन करणारे आहे.
तरी महाराष्ट्र राज्य प्रशासनास बहुजन मुक्ती पार्टी आवाहन करते की मानवी कर्मचारी, अधिकारी, कामगार यांना प्रयोगशाळा समजणे बंद करावे आणि लस घेण्याची सक्ती त्वरित थांबवावी. जर राज्य शासनाकडून व प्रशासनाकडून सक्ती थांबविली नाही तर पुढील आंदोलन तीव्र करण्यात येईल.
या आंदोलनास विशाल वाकोडे लोकसभा प्रभारी, बुलडाणा
प्रताप पाटील राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र
विनोद पवार जिल्हाध्यक्ष बुलडाणा
सागर मोरे जिल्हाध्यक्ष युवा आघाडी
समाधान ताजने प्रभारी चिखली विधानसभा
संजय इंगळे विधानसभा प्रभारी मलकापूर
विजय इंगळे
मधुकर आराख चिखली
सुधीर सोनटक्के
योगेश कांबळे
रवी मगर
महेंद्र गवई
संगीता मोहोड यांच्या सही अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.