राष्ट्रपती पुरस्कार विजेते प्रथमेश दाते यांचा रोटरी सेंट्रल एक्झीक्युटिव्ह प्रोबस क्लबतर्फे सत्कार

इचलकरंजी/प्रतिनिधी – येथील डिकेटीई संस्थेतील सहाय्यक ग्रंथपाल प्रथमेश दाते यांना इंटलॅक्च्युअल स्पेशल पर्सन या कॅटॅगरीमध्ये रोल मॉडेल म्हणून राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल रोटरी सेंट्रल एक्झीक्युटिव्ह प्रोबस क्लबतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रोबस क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपूते व प्रोबस क्लबचे अध्यक्ष विलास पाडळे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन दाते यांचा सत्कार केला. दरम्यान, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचे माजी अध्यक्ष उदय लोखंडे यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या संचालकपदी निवड झालेबद्दल सत्कार प्रोबस क्लबचे जेष्ठ सदस्य गजानन सुलतानपूरे यांनी केला. तर संतोष पाटील यांना महाराष्ट्राची गिरीशिखरे हा पुरस्कार मिळालेने त्यांचा सत्कार विश्वास चुडमूंगे यांचे हस्ते, प्रोबस क्लबचे राजन मुठाणे यांना महाराष्ट्र साहित्य परीषदेचा साहित्यिक कार्यकर्ता पुरस्कार मिळालेबद्दल त्यांचा सत्कार प्रकाश दत्तवाडे यांचे हस्ते, राजेंद्र कोठारी यांची रोटरी मानव सेवा ट्रस्टच्या सेक्रेटरीपदी निवड झाल्याबदद्ल त्यांचा सत्कार डॉ. कुबेर मगदूम यांचे हस्ते करणेत आला. तसेच प्रथमेश दाते यांच्या मातोश्री सौ. शारदा यशवंत दाते यांना सन 2019 साली वयोश्रेष्ठ माता म्हणून राष्ट्रपती पुरस्कार मिळालेबदद्ल त्यांचा सत्कार सौ. हेमल सुलतानपूरे यांचे हस्ते करणेत आला.यावेळी प्रोबस क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपूते यांनी  क्लबच्या कार्याचा आढावा व सत्कारमूर्ती यांच्या संबंधी गौरवपूर्ण मनोगत व्यक्त केले.स्वागत प्रोबस क्लबचे सेक्रेटरी  शिवबसू खोत यांनी तर प्रास्ताविक प्रोबस क्लबचे अध्यक्ष विलास पाडळे यांनी केले. डिसेंबर महिन्यात असलेल्या प्रोबस क्लब सदस्यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार उपाध्यक्ष गजानन शिरगूरे व इतर सदस्यांनी केला. आभार सौ. सुजाता कोईक यांनी मानले.याप्रसंगी सुर्यकांत बिडकर व बाळासो देवनाळ यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास अविनाश खोत, दिलीप भंडारे, अजित कोईक, सुनिल कोष्टी, सर्जेराव घोरपडे, प्रदिप लडगे, मोहनराव कुराडे, आप्पासो कुडचे, विजय हावळे, एम. के. कांबळे, महावीर कुरुंदवाडे, सुरेश जमदाडे, श्रीमती वर्षा कुलकर्णी, सौ. प्रमोदिनी देशमाने, सौ. शालिनी जगदाळे, सौ. संगिता लडगे, सौ. सुप्रिया कोष्टी, सौ. संजिवनी कोष्टी इत्यादी उपस्थित होते.