कोल्हापूर कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काही समाजकंटकांच्या कडून विटंबना करण्यात आली आहे हे सर्व रणधीर सेनेच्या संघटनेचे संबंधित असणारे समाजकंटक आहेत संबंधित समाजकंटकांवर जलदगती न्यायालय मध्ये खटला दाखल करावा या मागणीचे निवेदन भारतीय नागरिक मंच प्रणित जनसंघर्ष क्रांती मोर्चाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना निवेदन देण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबनेची जाहीर निषेध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणारे हे रणबीर सेनेच्या संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे तरी या रणधीर सेना संघ संघटना वर तात्काळ कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी जन संघर्ष मोर्चा चे संस्थापक संतोष आठवले जनरल सेक्रेटरी समीर विजापुरे हुसेन मुजावर नारायण कांबळे आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते
Posted inकोल्हापूर