सांगली सावंत प्लॉट रस्ता करणे बाबत निर्णय न झाल्यास चार दिवसानंतर महापौर व आयुक्तांच्या बंगल्यासमोर जोरदार निदर्शने करणार! कॉम्रेड शंकर पुजारी


सांगली महापूर यांच्या वॉर्डातील गलिच्छपनामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्ते गटारी नाहीत एक वर्षापासून वॉटरवर्स कडून लिकेज काढलेले नाही. त्यामुळे येथे दलदल साचलेली आहे. कचरा काढीत नसल्यामुळे डुकरांचे साम्राज्य या ठिकाणी आहे. हे सगळे विसरण्यासाठी त्याठिकाणी मात्र एक देशी दारूचे दुकान आहे. त्यामुळे या भागातून नागरिक ये-जा करीत असताना व या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे.
याबद्दल मागील अनेक वर्षापासून महानगरपालिकेस अनेक वेळा निवेदने देऊन सुद्धा काही सुधारणा झालेले नाही. याचे मुख्य कारण असे असावे आम्हाला वाटते की ते असे शंभर फुटी रोड ते सावंत प्लॉट रस्ता महानगरपालिकेने मंजूर करून सोळा लाख रुपये कामाची ऑर्डर काढलेली होती. तो रस्ता चोरीला गेलेला आहे. इतकेच नव्हे तर या भागांमध्ये मागासवर्गीय राहतात परंतु या मागासवर्गीयांचा निधी इतरत्र खर्च करण्यात आलेला आहे. जेथे रस्ताच करता येत नाहीत तेथे मागासवर्गीय फंडमधून रस्ते गटारी या भागात केलेले आहेत. या सर्व गैरव्यवहाराची चौकशी होऊन तातडीने रस्ता गटर होणे आवश्यक आहे. त्यामुळे या परिसरात आल्यानंतर लोकांना असे वाटते ही गलिच्छ व अस्वच्छ सांगली आहे. विशेषता महापौरांच्या वार्डातील ही अवस्था आहे तर इतर महापालिका क्षेत्रात काय असेल? असे या ठिकाणी येणारे लोक नागरिक बोलत आहेत. तरी या बाबत त्वरीत सुधारणा न झाल्यास नाईलाजास्तव या भागातील नागरिकांना महापौर व आयुक्तांच्या बंगल्यासमोर दररोज निदर्शने करावे लागतील अशी प्रतिक्रिया सांगलीतील नागरिकांतून व्यक्त होत आहे