इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ अध्यक्षपदी रामचंद्र ठिकणे; बसवराज कोटगी उपाध्यक्ष

इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ अध्यक्षपदी रामचंद्र ठिकणे; बसवराज कोटगी उपाध्यक्ष

इचलकरंजी/प्रतिनिधी –
सन 2021-21 सालासाठी इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रामचंद्र ठिकणे आणि उपाध्यक्षपदी बसवराज कोटगी यांची एकङ्कताने निवड करण्यात आली. नुतन कार्यकारीणी निवडीसाठी इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या सदस्यांची बैठक पत्रकार कक्षात पार पडली. यावेळी मावळते अध्यक्ष चिदानंद आलुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ङ्मा निवडी जाहीर करण्यात आल्ङ्मा.
यावेळी श्री. आलुरे यांनी नुतन कार्यकारीणीची घोषणा केली. त्यामध्ये धर्मराज जाधव (सचिव),   महावीर चिंचणे (खजिनदार) ङ्मांची तसेच सदस्यपदी बाळ मकवाना, सुभाष बोरीकर, अनिल दंडगे, चिदानंद आलुरे, शितल पाटील, भाऊसाहेब फास्के, पंडीत कोंडेकर, डॉ. पांडुरंग पिळणकर, बाबासो राजमाने, संभाजी गुरव, हुसेन कलावंत, अतुल आंबी, महेश आंबेकर, शिवानंद रावळ, सुभाष भस्मे, छोटुसिंग रजपूत ङ्मांची निवड करण्ङ्मात आली.
मागील वर्षी कोरोना  महामारीमुळे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.  मत्र सन 2022 यामध्ये इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. नुतन अध्यक्ष रा मचंद्र ठिकणे व उपाध्यक्ष बसवराज कोटगी यांनी, पत्रकार दिन कार्यक्रमासह वर्षभरात विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त करत पत्रकारांसाठी विविध लाभ मिळवून देण्यासाठी कार्यरत राहण्याचा  मनोदय   यावेळी व्यक्त केला. निवडीनंतर सर्व पदाधिकार्‍यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला