इचलकरंजी/प्रतिनिधी –
राष्ट्रीय स्तरावर समस्त नामदेव शिंपी समाज बांधवांचे एकत्रिकरण व संघटन बांधण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय नामदेव टांक क्षत्रीय महासभा जयपुर येथील पदाधिकार्यांनी इचलकरंजीतील नामदेव भवन येथे भेट दिली. यावेळी इचलकरंजीतील नामदेव समाज बांधवांच्या कार्याचे कौतुक करत या उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.
संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराजांची भागवत धर्माची पताका पंजाबमधील घुमानपर्यंत फडकविली. त्यांचाच विचार संपूर्ण राष्ट्रीय पातळीवर पोहचविण्याच्या उद्देशाने देशभरात संघटन बांधणी सुरु करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अखिल भारतीय नामदेव टांक क्षत्रीय महासभा जयपुर, छीपा समाजाच्या पदाधिकार्यांकडून विविध शहर आणि गावात जावून या उपक्रमाबद्दल माहिती देऊन मजबूत संघटन केले जात आहे. त्याच अनुषंगाने सोमवारी इचलकरंजी येथील नामदेव भवन येथे विविध मान्यवरांनी भेट देऊन उपक्रमांची माहिती दिली. त्यामध्ये दयानंद विश्वविद्यालयाचे माजी कुलपती आणि छीपा महासभेचे अध्यक्ष मोहनलाल छीपा, अखिल भारतीय नामदेव टांक क्षत्रिय महासभा अध्यक्ष अनुराग रुनवाल, महामंत्री गिरधारीलाल सर्वा, उपाध्यक्ष महावीर किजडा, मुख्य संघटन सचिव रामानंद, डॉ. महेंद कावलिया, गोकुलचन्द छापरवाल, सावरमल नथैया, सत्यनारायण गादा, रामगोपाल बरनिया, प्रकाश सारण, नवरतनमल तोलंबिया, रमेश अपूर्वा, बेनीगोपाल रताऊ, श्रीमती ममता धीधवाल, भंवरलाल सर्वा, रामगोपाल तोलंबिया, हंसराज, मनोहरलाल, जगदीश, हरिशंकर सारण, केशव रोहिल्ला, राजेंद्र टेलर, कमलकांत थारवान, डी. एल. नथैया, श्यामलाल थैपडा, नवलकिशोर टेलर, महेंद्र टेलर, सुशील टेलर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक इचलकरंजी नामदेव समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष राजन उरुणकर यांनी केले. कार्यक्रमास भावसार शिंपी समाजाचे अध्यक्ष दीपक राशिनकर, नामदेव महिला मंडळ अध्यक्षा सौ. सरोज उरुणकर, युवक संघटनेचे अध्यक्ष संदीप कल्याणकर, अनंतराव कुडाळकर, उमाकांत कोळेकर, प्रा. अनिल अवसरे, विजय खटावकर आदींसह शहर व परिसरातील समाजबांधव उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर महाराष्ट्र