जवाहरनगरातील मंदिरात हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा
इचलकरंजी/प्रतिनिधी –
येथील जवाहरनगर परिसरात लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या हनुमान मंदिरात श्री हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा व मंदिराचा कलशारोहण सोहळा मंगलाचार्य श्री स्वामी जगद्गुरु शंकराचार्य पीठ करवीर यांचे हस्ते आणि असंख्य भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक विधींनी पार पडला.
श्री हनुमान मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून जवाहरनगर परिसरात लोकसहभागातून श्री हनुमान मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. या मंदिरात श्री हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्यानिमित्त सप्ताहभर विविध धार्मिक विधी व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प.पु. चैतन्यभारती गुरु गंगाभारती मठाधिपती नरंदे यांच्या हस्ते व पुरोहित श्री दयानंद स्वामी व शिष्यगण यांचे सानिध्यात प्राणजलकुंभा स्थापना करुन सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. त्याचबरोबर ध्वजारोहण, मुहूर्तमेढ व विधीवत देवता प्राण काढणे, धान्य निवास, जल निवास, शय्या निवास, कुंभयात्रा, देवता मिरवणूक कार्यक्रम संपन्न झाले. तर मंगलाचार्य श्री स्वामी जगद्गुरु शंकराचार्य पीठ करवीर यांच्या हस्ते श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा, मंदिराचा कलाशारोहण सोहळा रुद्राभिषेक, पूजा, कलश पुजन, होमहवन व विविध विधीविधानांनी संपन्न झाला. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
या सोहळ्यानिमित्त महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा शुभारंभ कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे, जहांगिर पटेकरी, नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, माजी नगरसेविका सौ. मीना बेडगे, नगरसेविका नेहा हुक्कीरे, संग्राम स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला. या महाप्रसादाचा असंख्य भाविकांनी लाभ घेतला. याप्रसंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शंकरराव स्वामी, उपाध्यक्ष विजय कोराणे, खजिनदार विष्णू नाकील, सेक्रेटरी गणेश जगदाळे, वसंत मुळीक, बाबासो नाकील, सतीश मुळीक, राजेश देसाई, नितीन चिखलगे, सुरेश कडपट्टी, मारुती मुदगल, आगममामा, बंडा बाबर, रियाज मुल्ला, चंद्रकांत इंगवले, दिनेश कोराणे, राजू कडाले, बापूसो निंऊगरे, प्रविणकुमार निषाद, उत्तमराव विभुते, आप्पा पाटील, सतीश लाटणे, विनायक देव, फिरोज मुल्ला, बाळू लोटके, निखिल कागले, संजय बडे यांच्यासह आरबीसी ग्रुप व मंडळाचे कार्यकर्ते, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर