⭕ गावखेड्यातील समस्या, विकासाच्या नवीन संकल्पना जाणून घेण्यासाठी संघटनेमार्फत जनतेचा जाहीरनामा स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी: जिल्ह्यातील समस्या,विकासाबाबत जनतेच्या सूचना,मते आणि विकासाबाबत नवीन संकल्पना जाणून घेऊन गाव विकास समिती जिल्हा परिषद गटांचा जनतेचा जाहीरनामा तयार करणार असून उत्कृष्ट सूचना करणाऱ्या नागरिकांना गाव विकास समिती मार्फत बक्षीस देऊन सन्मानित केले जाणार असल्याची माहिती गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी दिली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना काय हवं आहे हे लोकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न गाव विकास समिती करणार असून यासाठी
गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटने मार्फत
जनतेचा जाहीरनामा
गावांचा विकासनामा! ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.सर्व जिल्हापरिषद गट व देवरुख नगरपंचायत साठी दोन स्वतंत्र जाहीरनामा स्पर्धा आयोजित केल्याची माहिती खंडागळे यांनी दिली आहे.
जनतेला काय हवं आहे हे जनताच चांगलं सांगू शकते..
आपल्या भागाचा विकास होण्यासाठी कोणत्या गोष्टी प्राधान्याने करायला हव्यात,आपल्या भागातील नेमक्या समस्या काय?जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काय कामे प्राधान्याने व्हायला हवीत?कोणत्या गोष्टी कडे दुर्लक्ष झाले आहे?गावांच्या विकासासाठी नवीन संकल्पना त्याच बरोबर पायाभूत सुविधांचा दर्जा राखण्यासाठी नागरिक म्हणून काय अपेक्षा आहेत… हे नागरिकांनी मोजक्या शब्दात लिहून खालील क्रमांकावर व्हॉट्स ऍप करावे !दिनांक 10 जानेवारी 2022 पर्यंत आपली मते डॉ.कांगणे- सरचिटणीस मोबाईल-9403099598 या क्रमांकावर पाठवावेत असे आवाहन सुहास खंडागळे यांनी केले आहे.
सर्वच सूचनांचा जनतेच्या विकासनाम्या मध्ये समावेश केला जाईल आणि उत्कृष्ट 20 सुचनां ज्या प्रत्यक्ष कृतीत येणे शक्य आहे अशांना योग्य बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले जाईल असेही गाव विकास समिती मार्फत जाहीर करण्यात आले आहे.
लोकांच्या सूचना घेऊन एक आदर्श विकासनामा गाव विकास समिती निर्माण करणार आहे.लोकांच्या सहभागातून बनणाऱ्या या जाहिरनाम्या नुसार काम करण्यासाठी नागरिकांची एक कमिटी नियुक्त करण्याचा निर्णय गाव विकास समिती घेणार आहे.लोकांच्या सहभागातून गावांचा विकास होणार असून सर्व विकास कामांवर लोकांचं लक्ष राहिले तर कामे दर्जेदार होतील आणि भ्रष्टाचार होणार नाही ही भूमिका गाव विकास समितीची आहे.शिवाय लोकांना जी कामे हवी आहेत ती कामे प्राधान्याने होतील…अनेक वेळा नेत्यांना कंत्राटे मिळण्यासाठी कोणतीही कामे केली जातात ज्याचा लोकांना फायदा नसतो, अशा चुकीच्या कामांना आळा बसेल असेही खंडागळे यांनी म्हटले आहे.
कोण सहभाग घेऊ शकतो..
रत्नागिरी जिल्ह्यातील गावखेड्यातील नागरिक/गावांशी संबंध असणारे परंतु नोकरीसाठी शहरात राहणारे नागरिक/ मुंबई मध्ये राहणारे चाकरमानी ज्यांना आपल्या गावाच्या विकासाबाबत अपेक्षा आहे आणि त्यांच्याकडे चांगल्या सूचना आहेत/महिला/कॉलेज तरुण-तरुणी या स्पर्धेत भाग घेऊ शकतात अशी माहिती गाव विकास समिती मार्फत देण्यात आली आहे.
👉🏻देवरूख शहरा संबंधित नगरपंचायत अंतर्गत स्पर्धेत तेथील नागरिक भाग घेऊ शकतात!
👉🏻रत्नागिरी जिल्हा आदर्श घडविण्यासाठी लोकांचा सहभाग महत्वाचा आहे,अनेक जाणकार नागरिक,तज्ञ तरुण/तरुणी या जिल्ह्यात आहेत त्यांच्या बुद्धीचा उपयोग जिल्ह्याच्या व ग्रामीण भागाच्या विकासासाठी झाला पाहिजे ही गाव विकास समितीची भूमिका आहे!जिथं शक्य आहे तिथं गाव विकास समिती लोकांच्या समस्यांची जाण असणारे उमेदवार उभे करणार ,जे लोकांच्या सूचना आणि सल्ला घेऊन लोकहिताची कामे करण्याला प्राधान्य देतील..!पैशांच्या जीवावर होणाऱ्या राजकारणाला आता आपण रामराम म्हणायला हवं असेही संघटनेने ही स्पर्धा आयोजित करताना म्हटले आहे.