मलकापूर प्रतिनिधी:करण झनके
बुलडाणा 21/12/21भारात देशाची अस्मिता असलेले जगमान्य छत्रपती शिवाजी महाराज यांची बंगळूर(कर्नाटक) येथे पुतळ्यावर काळी शाई टाकून जे विटंबना करण्यात आली त्यामुळे जगातील सर्व शिवप्रेमींच्या डोळ्यात पाणी आणि मनात आग लागली आहे.कर्नाटकच्या विकासात छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शाहजी राजे यांचे खूप मोठे योगदान आहे.अशा ठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता छत्रपती शिवरायांवर काळी शाई टाकून त्यांची विटंबना करतो आणि भाजपा चे मुख्यमंत्री त्याला पाठीशी घालतात हे चित्र न समजणार आणि शिवप्रेमींच्या रोषाला कारणीभुत आल्यामुळे संबधित दोन्ही व्यक्तींवर आपण कठोर कार्यवाही करावी जेणेकरून यानंतर कोणी असे कृत्य करण्याअगोदर हजारदार विचार करेल.शेवटी आपण पण छत्रपतींचा आशीर्वाद घेऊनच सत्तेत आला आहात.आणि म्हणून तुम्हाला आपुलकीने निवेदन सादर करत आहोत.शेवटी कायद्याचे बंधन आहे म्हणून ते दोन्ही नीच पातळीचे व्यक्ती जिवंत आहेत.तरी असा प्रकार पुन्हा घडून याचा प्रतिकार म्हणून चुकीचे पडसाद उमटू नये करिता आपण देशाचे माय बाप म्हणून स्वतः यामधे लक्ष घालून शिवप्रमिंना न्यान द्यावा असे निवेदन जिल्हाधिकारी बुलडाणा यांना संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील यांनी दिले.यावेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष सतीशजी दांडगे,जिल्हा सचिव श्रीकृष्ण भगत,जिल्हा संघटक करणसिंह सीरसवाल,तालुका प्रसिद्धी प्रमुख प्रफुल्ल बिचारे,शहराध्यक्ष देवेंद्र जयस्वाल उपस्थित होते
Posted inबुलढाणा