मलकापूर प्रतिनिधी:करण झनके
बुलडाणा 21/12/21 यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील काळी दौलत खान येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पुसद येथाल पत्रकार संदेश कानू व पत्रकार सय्यद फैजान यांच्यावर तीस ते चाळीस गाव गुंडांनी प्राणघातक हल्ला केला तसेच त्यांच्याजवळील वृत्तांकन करण्यासाठीचे अंदाजे ८० हजार रुपयांचे साहित्य लुटून नेले अश्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करा अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश दांडगे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की लोकशाहीचा चौथा आधारस्तं सलेल्या पत्रकारितेवर हा हल्ला असून याबाबत तात्काळ कारवाई करण्यात यावी . व पीडित पत्रकारांना पोलीस संरक्षण देण्यात यावे यासह पत्रकारांना संरक्षण मिळणे बाबतचे विविध विषयाचे निवेदन जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे देण्यात आले आहे त्यावेळी निवेदनावर राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष सतीश दांडगे, जिल्हा सचिव श्रीकृष्ण भगत, जिल्हा संघटक करणसिंग शिरसवाल, तालुका अध्यक्ष अमर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, प्रसिद्धीप्रमुख प्रफुल विचारे, शहराध्यक्ष देवेंद्र जयस्वाल, यासह पत्रकार उपस्थित होते.
Posted inबुलढाणा