चोपड्यात भाजपातर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली
चोपडा दि.२५ (प्रतिनिधी) माजी पंतप्रधान भारत रत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त तालुका व शहर भाजपा तर्फे आज सुशासन दिन साजरा करण्यात आला.भाजपाचे ज्येष्ठ नेते व राज्य भाजपा किसान मोर्चा चे माजी उपाध्यक्ष श्री.शांताराम भावलाल पाटील, माजी पं.स.सभापती आत्माराम भाऊ म्हाळके, तालुका अध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जैस्वाल,आदिंच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम सोत्साहात पार पडला.याप्रसंगी प्रमुख वक्ते शांताराम पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, जनसंघ ते भाजपा वाटचाली संदर्भात सविस्तर माहिती देऊन कार्यकर्त्यांची जान ठेवणारा पक्ष म्हणजे भाजपा असे त्यांनी आवर्जून सांगितले.
याप्रसंगी जिल्हा भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्ष पदी सौ.विजयाताई सुभाष पाटील यांची निवड झाल्याबद्दल तालुका महिला आघाडी अध्यक्षा सौ.ज्योत्सना चौधरी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच शहर सरचिटणीस पदाच्या रिक्त जागेवर हेमंत भाऊ जोहरी यांची निवड शहराध्यक्ष गजेंद्र जैस्वाल यांनी घोषित केली.त्यापित्यर्थ मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच भाजपा चे ज्येष्ठ कार्यकर्ते व पत्रकार अनिलकुमार पालिवाल यांनी स्व.अटलजींच्या आठवणी सांगितल्या.अड .एस.डि.सोनवणे यांनी जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत भाजपाचे पाईक असल्याचे आवर्जून सांगितले. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते हिंमतराव पाटील, हनुमंत राव महाजन,लक्ष्मण पाटील,आदि ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी प.स.सदस्य भरत बाविस्कर,मगन बाविस्कर, नरेंद्र पाटील, सुभाष पाटील, सुनील सोनगिरे, संजय श्रावगी,अमित तडवी,कृबान तडवी,पींटू पावरा, दिनेश पावरा, वसंत पावरा, गजानन कोळी, सुरेश चौधरी, मोहिते भावे, भूषण महाजन,अजय राजपूत यशवंतराव जडे, विजय पाटील,विजय बाविस्कर, जिल्हा उपाध्यक्ष राकेश शांताराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व.अटलजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रास्ताविक पंकज पाटील यांनी तर आभारप्रदर्शन गजेंद्र जैस्वाल यांनी केले.
Posted inBlog