ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लेमीन कोल्हापूर जिल्हा विद्यार्थी आघाडी पदनियुक्ती,पक्षप्रवेश, सत्कार समारंभ,शाखा उद्घाटन सोहळा संपन्न

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लेमीन कोल्हापूर जिल्हा विद्यार्थी आघाडी पदनियुक्ती,पक्षप्रवेश, सत्कार समारंभ,शाखा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्याला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लेमीन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव प्रा.शाहिद शेख,शहर कार्याध्यक्ष अय्याज मुजावर हाफीज खालीद जमादार, मौलाना अबुल वाहिद सिद्दीकी, मुस्लिम यळगुड समाजाचे अध्यक्ष अंजुम मुल्लाणी,निपाणी तालुका चे माजी नगराध्यक्ष झाकीर कादरी, AIMIM निपाणी चे मिडिया इन्चार्ज अत्ताऊल्ला जमादार ओबीसी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष दाऊद मुल्लांणी आदी मान्यवर उपस्थित होते..
AIMIM सांगली जिल्हा संघटक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली सन्माननीय ईलाही मुल्लांणी यांचा सत्कार जेष्ठ पत्रकार उत्तमराव व प्रा.शाहिद शेख यांच्या हस्ते करण्यात आला.
दरम्यान जयसिंग कांबळे,अत्ताऊल्ला जमादार, झाकीर कादरी,यांची भाषणे झाली.!
शेकडो कार्यकर्त्यांनी विद्यार्थी आघाडी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जावेद मुल्लाणी व कोल्हापूर जिल्हा महासचिव सुहेल शेख यांच्या नेतृत्वाखाली ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लेमीन पक्ष प्रवेश केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तौसीफ मुल्लाणी यांनी केले तर निहाल शेख यांनी आभार प्रदर्शन केले.