कबनूरात तीन ठिकाणी घरफोडी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास


कबनूर -(विशेष प्रतिनिधी चंदुलाल फकीर) कबनूर इंदिरा हौसिंग सोसायटी कबनूर व कबनूर परिसरातील बंद घरे व दुकान असे तीन ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करीत अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम दिड हजार असा सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून एका रात्री तीन ठिकाणी चोरी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
    याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, इंदिरा हौसिंग सोसायटी कबनूर मधील राहणारे माजी सैनिक ब्रह्मानंद साळुंके हे कुटुंबासमवेत परगावी गेले होते घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरी केल्याचा प्रकार शेजाऱ्यांच्या निदर्शनास आला त्यांची माहिती साळुंके यांना दिल्यानंतर साळुंके कुटुंबीय तातडीने घरी परतले त्यावेळी घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले त्यामध्ये अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने रोख रक्कम रुपये पंधराशे असा ऐवज लंपास केला असल्याचे स्पष्ट झाले याबाबत शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते मात्र काही अंतरावरच श्वान घुटमळताना दिसत होते पोलिसांनी पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरट्याने परिसरातील तीन ठिकाणी चोरी केल्याचे स्पष्ट झाले त्यामध्ये एक दुकान फोडण्यासह दुकानातील सीसीटीव्ही डीव्हीआरसुद्धा पळून नेला तर एका बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले.