सयाजी हॉटेल कोल्‍हापूरकडून ‘शुभ विवाह बाय सयाजी’ची घोषणा



सयाजी हॉटेल कोल्‍हापूरने सर्व स्‍वप्‍नवत गंतव्‍य विवाहांसाठी एक-थांबा सोल्‍यूशन ‘शुभ विवाह बाय सयाजी’ची घोषणा केली आहे. ही संकल्‍पना काळजीपूर्वक डिझाइन केलेले विवाह पॅकेजेस् देते, जे वैयक्तिकृत केअरसह भव्‍य समारोहाचा अनुभव देतात. कोल्‍हापूरमधील विवाह भव्‍य सोहळा असतात आणि सयाजी हॉटेल कोल्‍हापूर दक्षिण महाराष्‍ट्रातील सर्वात लोकप्रिय गंतव्‍यांपैकी एक आहे. आगामी विवाह हंगामासाठी हॉटेलच्‍या बुकिंग्‍जमध्‍ये वाढ झाल्‍याचे दिसण्‍यात आले आहे आणि अनेक शुभ मुहूर्तांसाठी बंक्‍वेट्सचे यापूर्वीच बुकिंग करण्‍यात आले आहे.
”आम्‍हाला ‘शुभ विवाह बाय सयाजी’ लाँच करण्‍याचा अत्‍यंत आनंद होत आहे. ही सुविधा अद्वितीय सेवांसह अनेक संस्‍मरणीय अनुभव देते. कोल्‍हापूरमधील परिपूर्ण विवाह स्‍थळाचा शोध घेणारी मंडळी आकर्षक बॉलरूम, विस्‍तीर्ण बाहेरील जागा किंवा आकर्षकरित्‍या डिझाइन केलेल्‍या बँक्‍वेट्सची निवड करू शकतात. आम्ही विविध धार्मिक रीतिरिवाजांशी जुळवून घेऊन आणि वैयक्तिकृत पाककृती, थीम्ड डेकोर, तसेच या प्रसंगाच्या विशिष्टतेला आदर्शपणे पूरक असलेल्या सर्वोत्तम सेवा देऊन भारतीय विवाहांची कला परिपूर्ण केली आहे. सयाजी हॉटेल कोल्हापूर गेल्‍या अनेक वर्षांपासून वैभव, सर्वोत्तम आदरातिथ्य आणि महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेच्या भावनेचे प्रतीक आहे. आयुष्यभर संस्‍मरणात राहतील अशा आठवणी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्‍न आहे,” असे सयाजी हॉटेल कोल्‍हापूरच्‍या कार्यसंचालनांचे संचालक मुकेश रक्षित म्‍हणाले.
इन-हाऊस वेडिंग स्‍पेशालिस्‍ट टीम प्रत्‍येक बारीक-सारीक गोष्‍टींवर काळजीपूर्वक लक्ष देते, ज्‍यामुळे अतिथी प्रत्‍येक खास क्षणाचा आनंद घेऊ शकतील आणि नवविवाहित आनंदी जोडपे त्‍यांच्‍या जीवनातील महत्त्वपूर्ण क्षणांवर लक्ष केंद्रित करू शकतील. टीम ऑफरिंग्‍ज सानुकूल करत मूल्‍यवर्धित सेवा देते. यामध्‍ये वैयक्तिकृत ई-इन्‍व्‍हीटेशन्‍स, सर्जनशील फुलांचा देखावा, मंत्रमुग्ध करणारी सजावट, ऑडिओव्हिज्युअल्स, जागतिक दर्जाचे मनोरंजन, वेलनेस ऑफर आणि खास क्षण टिपण्यासाठी अद्वितीय फोटोग्राफीचा समावेश आहे. अत्यंत अनुभवी शेफ स्‍वादिष्‍ट व सर्वोत्तम पाककला तयार करतात, ज्‍यामध्‍ये चमचमीत खाद्यपदार्थ व उत्‍कृष्‍ट फ्लेवर्स आहेत. समकालीन घटकांनी भरलेल्या आलिशान खोल्या आणि सूट्स भेट देणा-या पाहुण्यांना अत्यंत आराम देतात.
सेलिब्रेशन कितीही उत्‍साहपूर्ण असो सयाजी हॉटेल्‍स प्रत्यक्ष व व्‍हर्च्‍युअल विवाह सोहळ्यांसाठी सोशल डिस्‍टन्सिंग नियमांचे पालन करत परिपूर्ण यजमानीची भूमिका बजावतात. ऑनलाइन बाय सयाजी संकल्‍पनेच्‍या माध्‍यमातून हॉटेल दुस-या शहरांमध्‍ये असलेले नातेवाईक व मित्रांसाठी विवाहाच्‍या वेब प्रसारणाची सुविधा देईल. ज्‍यामुळे तुम्‍ही दुरून देखील विवाहामधील प्रत्‍येक क्षण जसे एकत्र असण्‍याचा आनंद, गायन, नृत्‍य, विधी, समारोह शेअर करू शकता.
सौगात बाय सयाजी तुम्‍हाला दूर शहरांमध्‍ये असलेले तुमचे नातेवाईक व मित्रांना आनंद शेअर करण्‍याची आणि हस्‍तशिल्‍पयुक्‍त आकर्षक हॅम्‍पर्स देण्‍याची सुविधा देते. अतिथी आमच्‍या मास्‍टर शेफ्सकडून तयार करण्‍यात आलेल्‍या विविध पाककृतींमधून निवड करण्‍यासोबत ते सानुकूल देखील करू शकतात.
बी३ बॉक्‍सेस बाय सयाजी अतिथींना हॉटेलमध्‍ये सर्व्‍ह करण्‍यात आलेल्‍या पाककला त्‍याच शहरातील त्‍यांच्‍या घरी डिलिव्‍हर करण्‍याची सुविधा देते. विवाह सोहळ्यासाठी मोठ्या संख्‍येने अतिथी येणार असतील तर बँक्‍वेट बुक करा, मोठ्या पडद्यावर विवाहाचे प्रोजेक्‍शन करा आणि विवाहामध्‍ये सर्व्‍ह करण्‍यात येणा-या पाककृतींचा आस्‍वाद देखील घेऊ द्या.