बुलडाणा जि.प.चे माजी सदस्य श्री.समाधानजी हिवाळे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह ‘स्वाभिमानी’त प्रवेश…

बुलडाणा जि.प.चे माजी सदस्य श्री.समाधानजी हिवाळे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह ‘स्वाभिमानी’त प्रवेश…

बुलडाणा तालुक्यातील साखळी बु.चे भूमिपुत्र श्री समाधानजी हिवाळे हे शिवसेनेचे जि.प.सदस्य होते. त्यांनी तीन वेळा जि.प. निवडणूक लढली. त्यांच्या पत्नी तारामती हिवाळे ह्या ग्रा.पं.सदस्या होत्या. त्यांनी पं.स.च्या निवडणूकीतही चांगली लढत दिली होती. श्री.हिवाळे यांचा जनसंपर्क तगडा आहे. ते सामान्य माणसाशी नाळ जोडून आहेत. अत्यंत सुस्वभावी, मनमिळाऊ, स्वाभिमानी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. मजबूत जनाधार असल्याने राजकीय क्षेत्रात त्यांचे वजन आहे. २५ वर्षे त्यांनी व गजानन देशमुख(गुरुदत्त)यांनी शिवसेना पक्षात अविरत काम केले.श्री.हिवाळे व गुरुदत्त माऊली यांच्या सहकाऱ्याचे आज ‘स्वाभिमानी’ परिवारात स्वागत केले. स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर येथे आज प्रवेश सोहळा पार पडला.

प्रवेश घेणाऱ्यांमध्ये समाधान हिवाळे, यांच्या समवेत गजानन देशमुख, शांताराम सुसर (मा.उपसरपंच), श्रीराम वाघमारे, अण्णा सुडके, गोविंदा उगले, प्रवीण चौथनकर, गणेश वाघमारे,जयराम चौथनकर, रविकांत भोरकडे, संजय भागवत, सुभाष भोरकडे, सुनील भागवत, आनंदा सुरडकर, जितेंद्र राठोड, सांडू भोरकडे, भगवान भोरकडे, सुरेश उगले, गजानन देशमुख ,विजय हुडेकर, सुरेश भोरकडे, नानाराव देशमुख, विजय भागवत, मंगेश गायकवाड, राजेश लहासे, माधव दरागे, सतिश चौधरी, पवन भागवत, गणेश चौधरी, आनंदा भागवत, संजय भागवत यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला.

यावेळी ‘स्वाभिमानी’चे नेते महेंद्र जाधव, शे.रफिक शे.करीम, पवन देशमुख, Adv राज शेख, नगरसेवक मोहम्मद अजहर, वसीम भाई, दत्ता जेऊघाले, महेश जाधव, अंकुश सुसर,आकाश माळोदे, संदीप मुळे, अनिल पडोळ,संदीप जेऊघाले, गोपाल जोशी, साजीद भाई, भगवान उबरहंडे, पवन काकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.