जळगाव जामोदमध्ये घर फोडून सोने-चांदीचे दागिने रोकड लंपास!; चोर असे घुसले घरात…

जळगाव जामोदमध्ये घर फोडून

सोने-चांदीचे दागिने रोकड

लंपास!; चोर असे घुसले

घरात…

जळगाव जामोद (बुलडाणा ) संडास – बाथरूमजवळील गेट सरकवून स्वयंपाकघराचे लॉक तोडून घरात शिरत चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा ६१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना जामोद (ता. जळगाव जामोद) येथील शिवापुरा भागात २५ डिसेंबरला पहाटे अडीचच्या सुमारास घडली. जळगाव जामोद पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सागर महादेव भोपळे (३०, रा. शिवापुरा) या शेतकऱ्याने या प्रकरणात तक्रार केली आहे. ते २५ डिसेंबरच्या रात्री कुटुंबासह झोपलेले होते. मध्यरात्री अडीचला त्यांच्या वडिलांनी आवाज देऊन त्यांना उठवले व घरात चोरी झाल्याचे सांगितले. त्यांनी पाहिले असता चोरट्यांनी स्टोअर रूममधील लोखंडी कपाट फोडलेले होते. सामान्य अस्ताव्यस्त फेकलेले होते. चोरट्यांनी लॉकर तोडून सोन्याचे मंगळसूत्र ( किंमत ३० हजार), सोन्याचा कानातील दागिना (किंमत १५ हजार), सोन्याचा एक ग्रॅमचा ओम (किंमत ३ हजार), सोन्याची अंगठी (किंमत ३ हजार) यासह अन्य छोटे मोठे ५७ हजार ७०० रुपयांचे दागिने आणि रोख चार हजार दोनशे रुपये चोरट्यांनी चोरून नेल्याचे दिसून आले.