,
नांदुरा :- तालुक्यातील केदार गावात मुलांचा उत्साह वाढविण्यासाठी किशोर इंगळे यांनी त्यांच्या मुलाच्या द्वितीय वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेपायोगी साहित्य वाटप करून साजरा केला,
श्री, किशोर आत्माराम इंगळे हे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष असून नेहमीच विविध सामाजिक उपक्रम ते राबवित असतात. त्यांचा मुलगा अयांश इंगळे याचा द्वितीय वाढदिवस जिल्हा परिषद शाळा केदार येथील सर्व मुलांना शालेय साहित्य वाटप आणि मिठाई वाटप करून साजरा करण्यात आला. तसेच अंगणवाडीच्या आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले व हायमास्ट ल्यांपचे उद्घाटन करण्यात करून संध्याकाळी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, या कार्यक्रमाला उपस्थिती श्री.अनिल गिरी नायब तहसीलदार नांदुरा श्री. बंगाले मंडळ अधिकारी श्री. सतीश उगले कनिष्ठ लिपिक श्री. वैभव ढोले कोतवाल श्री,संतोष तायडे पत्रकार श्री, ज्ञानेश्वर ढोले सरपंचपती श्री, सुनील बाजारे श्री, कडूजी ब्राह्मणे तंटामुक्ती अध्यक्ष श्री, आत्माराम इंगळे श्री, राजेश इंगळे सूत्रसंचालन श्री, अरविंद जोशी सर श्री,काळूसे सर ,आभार प्रदर्शन अमर रमेश पाटील नांदुरा तालुका अध्यक्ष राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ यांनी केले व केदार गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते,