कोष्टी समाज महिला मंडळ कोल्हापूर व लायन्स क्लब कोल्हापूर वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने
कोष्टी समाज महिला मंडळ कोल्हापुर.. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन..
मंगळवार पेठेतील चौंडेश्वरी संस्कृतीक हॉल येथे सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत करण्यात आले..डॉक्टर संदीप पाटील,डॉ. नचिकेत पाटीलडॉ. उज्वला देसाईडॉ. इरफानडॉ. सुलताने व यांचे सहकारीटीमडॉ. अमृता कोठावळे तसेच डॉक्टर यांनी महिलांमधील वाढत्या हाडांच्या समस्या व फिजिओथेरपी यावर हे विशेष मार्गदर्शन केले.
संदीप पाटील यांनी यावेळी जीवनशैलीमध्ये झालेले बदल व त्याचा होणारा परिणाम याचा विचार करून आपण कसे आजपासूनच व्यायाम आणि खाण्यावर नियंत्रण करून आपले आरोग्य सुदृढ करू शकतो याचे अत्यंत उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले… भारतीय संस्कृतीने ज्या गोष्टी शिकवल्या आहेत त्याचे अनुकरण केल्यास आपले जीवन एका चांगल्या स्तरावर ती जाऊ शकते व ते आत्मसात आपण लवकरात लवकर करावे असे आवाहन देखील केले..
डॉक्टर अमृता कोठावळे यांनी
स्त्रियांमध्ये होणारी हार्मोनल चेंजेस व त्यानुसार होणारे बदल याचा विचार करून वेळोवेळी कडे लक्ष देण्यासाठी तत्पर रहावे असे सांगितले महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात योग्य आहार व व्यायाम यांची सांगड घालावी असे सांगितले..
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र फातले, उपाध्यक्ष गजानन समंग राम मकोटे,. शैला मोरे व इतर संचालक तसेच लायन्स क्लब कोल्हापूर वेस्ट चे अध्यक्ष श्री. मोहन हजारे व पदाधिकारी उपस्थित होते .
महिला मंडळ सदस्य रूपाली मकोटे, वनिता ढवळे, संगीता मकोटे, सायली मकोटे, रुपाली कवडे, राधिका मुसळे, शुभांगी कवडे, माया तागारे तसेच महिला मंडळ कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या..
सर्व रोग व तपासणी शिबिरामध्ये समाजातील व भागातील 100 पेक्षा अधिक नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला..
नागरिकांना मोफत तपासणी सह ईसीजी सुविधा पुरवण्यात आली औषधांचे वितरण मोफत करण्यात आले.
लायन्स क्लब कोल्हापूर वेस्ट व
श्री देवांग कोष्टी समाज चौंडेश्वरी मंदिर व बोर्डिंग या संस्थेचे विशेष सहकार्य लाभले