मुंबई- दि. 23 डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसींच्या आरक्षणाच्या हक्कासाठी थेट विधानभवनावर मोर्चा काढला होता. या मोर्चात वंचितच्या कार्यकर्त्यांना ठिकठिकानाहून पोलिसांनी धरपकड सुरु केली होती. त्यांनतर धडक मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या ऍड प्रकाश आंबेडकरांना हि पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
त्यावेळी माध्यमांशी बोलताना ऍड प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेचा ठराव राज्य सरकारने विधानसभा अधिवेशनात मांडावा आणि तो ठराव केंद्र सरकार आणि जनगणना आयोगास पाठवावा तसेच त्यासाठी लागणारा खर्च राज्य सरकार करण्यास तयार आहे असे सांगावे. जेनेकरून केंद्राला ओबीसींच्या जातीनिहाय जनगणना करावी लागेल. आणि त्यातून आवश्यक असलेला एम्प्रियल डेटा प्राप्त होईल.
दरम्यान आज महाराष्ट्र् विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी ओबीसीं संदर्भात ठराव घेण्यात आला. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत आणि तशा पद्धतीने निवडणूक आयोगाला माहिती देण्यात यावी, असा एक ठराव विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्या संगनमताने सभागृहात मंजूर केला. असल्याची माहिती ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
ओबीसींच्या संदर्भात केंद्र सरकारने फेरविचार याचिका दाखल केली आहे. यात महाराष्ट्र सरकारच्या बाबतीत जो निर्णय देण्यात आला, त्याबद्दल आम्ही वकिलाचा सल्ला घेत आहोत. केंद्र सरकारच्या या याचिकेला साथ देण्यासाठी आम्हीही सामील होणार आहोत, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांनी दिली.