कवळटेक शाळेच्या दुरावस्थेबाबत संबधीत शिक्षक व अधिकांऱ्यांची चौकशी करुन कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर समोर बेमुदत उपोषण आंदोलन
कवळटेक (ता.गगनबावडा )येथील प्राथमिक शाळेच्या दुरावस्थेबाबत संबंधित शिक्षक व संबंधित जबाबदारी अधिकारी यांची सखोल चौकशी करून कारवाही करावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागणी करता जनसंघर्ष क्रांती मोर्चा यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे दिनांक 24 जानेवारी 20 21 सकाळी अकरा वाजल्यापासून बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती संतोष आठवले यांनी दिली
कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटलेआहे सदर शाळेच्या दुरावस्थेचे व्हिडीओ फुटेज घेतले असून, शाळेची स्टाफरूम , विध्यार्थी बैठक व्यवस्था, स्वच्छता गृह, पिण्याच्या पाण्याची सोय, शाळेची पडझड याकडे संबधित विभागाने दुर्लक्ष केले आहे.
शाळेत कोणी शिक्षक येत नाहीत असे दिसून आले आहे. संबधीत शिक्षक व अधिकारी यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व अधिकारी यांनी शाळेच्या दुरावस्थेबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही. जाणीव पूर्वक दुर्लक्ष केलेले आहे. निष्काळजीपणे वागणारा शिक्षक व अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी. शाळेची समक्ष पाहणी करून संबधित शिक्षक व अधिकारी यांचेवर त्वरित कारवाई करावी अन्यथा शिक्षण मंत्री व मुख्यमंत्री यांचेकडे दाद मागणार असलेचे निवेदनात म्हंटले आहे. निवेदनावर संतोष आठवले समीर विजापुरे डॉक्टर एस के माने जी एस कांबळे आदींच्या सह्या आहेत