वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ मंडळींचे मार्गदशन पर हितगुज व आरोग्य दिनदर्शिका 2022 – प्रकाशनाचे गुरुवारी हदयस्पर्श वतीने आयोजन
कोल्हापूर : ‘चला नववर्षाचे स्वागत करूया – जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवूया’ हे आनंदी घोषवाक्य घेऊन, नववर्षाच्या पूर्वसंध्येला यंदाचे २०२१ वर्षाला अखेरची सलामी देत नववर्ष २०२२ वर्षाचे हर्षोत्फुल्ल आरोग्यदायी स्वागत करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन हृदयस्पर्श सोशल अँन्ड कल्चरल फाऊंडेशन या संस्थेने केलेले आहे. गुरुवार दि. ३० डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेचार वाजता शाहू स्मारक दसरा चौक येथे या कार्यक्रमाचे आयोजन कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करून करण्यात येत आहे. शायरन फीचर्स या संस्थेची प्रतिवर्षी प्रकाशित होणारी आरोग्यविषयक समग्र माहिती देणारी सन २०२२ सालच्या नव्या दिनदर्शिकेचे अनावरण या कार्यक्रमांमध्ये संपन्न होणार आहे. त्या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय कीर्तीचे स्त्री शल्यचिकित्सक डॉ. सतिश पत्की, संकल्प थेरपीचे डॉ. पी. एन. कदम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, आरोग्य विभाग संचालिका डॉ. भावना चौधरी, वैद्य अश्विनी माळकर, सावलीचे किशोर देशपांडे, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, जिल्हा लसीकरण प्रमुख डॉ. फारुख देसाई, राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे जिल्हा सचिव शरद पाटील, डॉ. संदेश कचरे, शाहू मॅरेथॉनचे चंद्रकांत झुरळे आदी मान्यवर गत दोन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विषयक मार्गदर्शनपर हितगुज करणार आहेत. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे. असे आवाहन ह्रदयस्पर्श आणि शायरन फीचर्स यांनी केले आहे.