इचलकरंजी येथे प्रकाश आवाडे क्रीडा अकॅडमी व मनीषा बुद्धिबळ मंडळ तर्फे घेण्यात आलेल्या जलद खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत अथर्व अमृत तावरे याने 12 वर्ष खालील स्थानिक गटात प्रथम क्रमांक मिळवला. 9 वर्ष खालील स्थानिक गटात शौर्य निकुंज बगडीया याने द्वितीय क्रमांक पटकावला . प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोख रक्कम, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.त्यांना बुद्धिबळ प्रशिक्षक रोहित पोळ (केन चेस अकॅडमी , इचलकरंजी ) यांचं मार्गदर्शन लाभत आहे . आराध्य ठाकुरदेसाई याने तृतीय क्रमांक चे मेडल व प्रमाणपत्र मिळवले . आराध्य ला बुद्धिबळ प्रशिक्षक शंकर आडम (केन चेस अकॅडमी, इचलकरंजी) यांचं मार्गदर्शन लाभत आहे. यापुढे ही होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेत केन चेस अकॅडमी, इचलकरंजी चे खेळाडू नक्की अजून चांगली कामगिरी करतील असा विश्वास केन चेस अकॅडमी चे बुद्धिबळ प्रशिक्षक रोहित पोळ यांनी व्यक्त केला आहे.